हरिहर आ. सारंग
आपल्याकडे वळलेले मतदार राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे…
कर्नाटकात भाजप पराभूत झाला, याचा अर्थ मतदारांनी या पक्षाकडे पाठ फिरवली, असा होतो का? आकडेवारी पाहता, या प्रश्नाचे उत्तर‘नाही’ असे मिळते. भाजपच्या मतांमधील घट नगण्य म्हणावी एवढीच आहे. तरीही भाजपचा एवढा दारुण पराभव का झाला? याप्रश्नाचे उत्तर जेवढे भाजपच्या त्या राज्यातील कामगिरीत सापडते, तेवढेच ते जनता दलाच्या घटलेल्या मतांमध्येही आढळते.
सन २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत तीन कोटी ६७ लाख ३९ हजार ५६२ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्कबजावला. त्यापैकी एक कोटी ३३ लाख २८ हजार ५२४ मतदारांनी आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले. एकूण मतदानाच्या तुलनेतत्याची टक्केवारी ३६.३५ एवढी येते. पण भाजपने त्या वेळी २२४ पैकी २२३ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे २२३मतदारसंघांपुरती ही टक्केवारी ३६.४३ एवढी येते. २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तीन कोटी ९१ लाख २४ हजार५९३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी एक कोटी ४० लाख ९६ हजार ५२९ मतदारांनी भाजपला मतदान केल्याचेदिसते. या मतांची एकूण मतदानाच्या तुलनेतील टक्केवारी ३६ एवढी आहे. थोडक्यात या वेळी ०.४३ टक्के मतदारांनी भाजपकडे पाठफिरविल्याचे दिसते. या टक्क्यांचे रूपांतर मतदारांच्या संख्येत केल्यास या वेळी गेल्या वेळेच्या तुलनेत एक लाख ६८ हजार २३५मतदारांनी भाजपला मतदान केलेले नाही. याचा अर्थ भाजपने आपले निष्ठावंत मतदार फारसे गमावल्याचे दिसत नाही. ध्रुवीकरणाचेधोरण आणि नरेंद्र मोदी यांचा आक्रमक प्रचार यामुळे भाजपचे पारंपरिक मतदार बऱ्यापैकी टिकवून ठेवण्यात त्या पक्षाला यश मिळाले. पण भाजप आपले मतदार गेल्या वेळेपेक्षा वाढवू शकला नाही, हेही स्पष्ट होते. उलट या पक्षाचे थोडे का असेना मतदार कमीच झालेआहेत.
जनता दलाच्या मतदारांची बदललेली भूमिका
भाजपविरोधी मतदारांनी भाजपचा योजनाबद्ध रीतीने पराभव केल्याचे दिसून येते. काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी जरी युतीकेली नाही तरी जनता दलाच्या पाच टक्के मतदारांनी आपली मते जनता दलाला न देता कदाचित काँग्रेसच्या पदरात टाकली असावीत. जनता दलाला आपली मते देऊन भाजपचा पराभव करता येणार नाही. उलट त्याने भाजपचा फायदाच होणार आहे, असा विचार यापैकीबऱ्याच मतदारांनी केला असावा. कारण जनता दलाची गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ५ टक्के मते कमी झाली आहेत. आणि त्याच वेळीकाँग्रेसच्या मतदानाची टक्केवारी ४.७४ टक्क्यांनी वाढली आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांनी भाजपला धोका दिला नसला तरीभाजपच्या विरोधात असलेल्या मतदारांनी मात्र भाजपचा पराभव करण्याचा निर्धार केल्याचे दिसते. याचा अर्थ एवढाच की भाजपच्यासमोरची समस्या फार मोठी नाही. राज्य सरकारवर लोक नाराज होते, यात शंका नाही. त्यामुळे काठावरचे काही मतदार भाजपपासूनकाही काळ दूर गेले असावेत. असे मतदार भाजप पुढच्या निवडणुकीत आपल्याकडे सहज ओढू शकते. भाजपचा पराभव करण्यासाठीजनता दलाचे जे मतदार मोठ्या संख्येने काँग्रेसकडे झुकल्याचे आपणास दिसते, हे मतदार पुढच्या निवडणुकीतही आपल्याकडेराखण्याचे आव्हान मात्र काँग्रेसपुढे आहे, हे नक्की.
भाजपच्या पारंपरिक मतदारांवर झालेला परिणाम
भाजपचे पारंपरिक मतदार भाजपपासून फारसे दूर गेले नसले तरी या वेळी कर्नाटकातील राजकीय वातावरणाचा कल भाजपच्याविरोधी आणि काँग्रेसच्या बाजूने असल्याचा अंदाज प्रसारमाध्यमांतून आणि राजकीय निरीक्षकांकडून सातत्याने व्यक्त केला जात होत. एक्झिट पोलचे निकालही वरीलप्रमाणेच आले होते. भाजपचे मतदार बदलले नसले तरी असे वातावरण निर्माण होण्यामागे कोणतेकारण असावे? मला वाटते, भाजपचे मतदार भाजपशी निष्ठावान राहिले तरी ते राज्य सरकारच्या कामामुळे उदासीन झाले असावेत. परिणामी त्यांचा राजकीय उत्साह कमी झालेला असावा आणि त्याच वेळी भाजपचे विरोधक, मग ते जनता दलाचे मतदार असोत वाकाँग्रेसचे, भाजपला तीव्र विरोध व्यक्त करते झाले. त्याचप्रमाणे भाजपने राज्यात हिजाब, टिपू सुलतान, मुस्लीम आरक्षण आदीविषयांच्या आधारे ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. पण राज्यातील जनतेने त्याला मुळीच प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या ध्रुवीकरणाचे यश हेकेवळ आपले पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यापुरते मर्यादित राहिले.
मुस्लीम व गरीब मतदारांची भूमिका आणि तिचा परिणाम
या ध्रुवीकरणाचा एक वेगळा परिणाम झाल्याची शक्यता मात्र आहे. या वेळी कदाचित राज्यातील मुस्लिमांनी आपली मते वेगवेगळ्यापक्षांत वाटली जाऊन वाया जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले असावेत. त्यासाठी त्यांनी आपली मते एकगठ्ठा करून काँग्रेसच्या पारड्यातटाकण्याचा प्रयत्न केला असावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील भाजप सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे लोकांनासातत्याने जाणवत होते. महागाई, बेरोजगारी या समस्यांमुळे सामान्य लोक त्रस्त झालेले होते. त्यातच काँग्रेसने भाजप सरकारच्याभ्रष्टाचाराचा मुद्दा जोरकसपणे जनतेसमोर मांडला. त्याचसोबत गरिबांना थेट लाभ देणाऱ्या योजना जनतेसमोर ठेवल्या. त्यामुळेकर्नाटकातील वातावरण भाजपच्या चांगलेच विरोधात गेल्याचे जाणवत होते. त्याचे प्रत्यंतर निकालांतून आले. परंतु भाजपच्यापारंपरिक मतदारांची निष्ठा आणि काठावरची मते पुन्हा आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची भाजपची क्षमता लक्षात घेतल्यास, पुढील निवडणुकीत हाच ट्रेंड कायम राहील याची मुळीच खात्री देता येणार नाही, असे वाटते.
harihar.sarang@gmail.com