आता सरकार स्थापन झाले, म्हणजे संसार सुरू झाला म्हणून नांदा सौख्यभरे म्हणायचे. कोण कुठून कुठून आले, त्यात रुसवे फुगवे झाले, कुणी कुणाला काय (अहेर) दिले, घेतले याचे व्यावहारिक हिशेब झाले. ते पुढेही होत राहतील. घरच्यांना सांभाळायचे, बाहेरून आलेल्याचा पाहुणचार करायचा, प्रत्येकाला हवे नको ते बघायचे म्हणजे यजमानांसाठी तारेवरची कसरत. पत्रिका जुळल्या म्हणून स्वभाव जुळतील याची खात्री नसते. सरकारच्या संसारातही तडजोडी कराव्याच लागतात. कुणाचे घराणे मोठे, कुणाचा अनुभव दांडगा, कुणाचे आर्थिक पाठबळ मोठे, शिवाय जाती धर्माची समीकरणे वेगळी… हे सारे तोलून मापून पुढे जायचे म्हणजे तारेवरची कसरत. पण ती करताना फक्त आपापला विचार करू नका. ज्यांनी तुमचे हे लग्न जमवून आणले त्या वरातीतल्या वऱ्हाडी मंडळींचा विचार करा. त्यांनीच तुम्हाला सत्तेच्या बोहल्यावर बसवले हे विसरू नका. मधुचंद्र फक्त चार आठ दिवसांचा असतो. नंतरचा संसार, त्यातले जमाखर्च, उत्पन्न, विकास हा जास्त मोलाचा असतो. फक्त स्वार्थाचा, स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचा विचार न करता, जनतेचा विचार करा. अवतीभवती कुणाला काय हवे नको ते बघा.

फुकटच्या खिरापती वाटून सरकारी तिजोऱ्या रिकाम्या करू नका. इथे प्रत्येकाला स्वाभिमान आहे. आत्म सन्मान आहे. कुणालाही भीक नको आहे. त्यांना उत्तम शिक्षण द्या, त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी उत्तम दवाखाने बांधा. फक्त संख्यावाढ कामाची नाही. गुणवत्ता महत्त्वाची असते. दर्जा सांभाळायचा असतो. एरवी शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे, आयआयटी यांची संख्या गेल्या काही वर्षात भूमिती श्रेणीने वाढली. पण दर्जा त्या प्रमाणात नाही राखला गेला. अनेक शाळा कॉलेजात, विद्यापीठात हव्या त्या प्रमाणात शिक्षक प्राध्यापक नाहीत. अनेक सरकारी पदे वर्षानुवर्षे भरली गेली नाहीत. कंत्राटी कारभार सुरू आहे. त्यात गांभीर्य नसते. जबाबदारी नसते. आपलेपणा नसतो. प्रत्येकाला हाताला काम हवे आहे. त्यासाठी योग्य कौशल्य शिक्षण हवे आहे. योग्य मार्गदर्शन हवे आहे. आजची तरुणाई भरकटलेली आहे. दिशाहीन झाली आहे. त्यांना नीट समुपदेशनाची गरज आहे. चांगले काय, वाईट काय हा विवेक जागृत करण्याची गरज आहे. एरवी नवे शैक्षणिक धोरण, किंवा तत्सम चांगल्या योजना फक्त दप्तरी पडून राहायला नकोत. योजना उत्तम असतात. त्यामागचा विचार, उद्दिष्ट हेही चांगले असते. पण ते जिथे झिरपायचे तिथे खोलवर रुजले पाहिजे. इकडे तिकडे वाया जायला नको.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”

हेही वाचा…लेख : घोंघावणारी आर्थिक वादळे!

अजूनही शेतकरी नाराज का आहेत? त्यांच्या नेमक्या समस्या, गरजा काय आहेत, याचा सहानुभूतीने विचार करायला हवा. त्यांच्या खऱ्या समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यायला हव्यात. त्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळाला, चांगली बाजारपेठ मिळाली, वेळेवर वीज पाण्याची सोय झाली तर त्यांनाही कर्जमाफीची गरज भासणार नाही. तिथंही व्यसनाच्या आहारी गेलेल्या कुटुंबीयांना समुपदेशनाची, उपचाराची गरज आहे. शरीराचे आरोग्य जितके महत्वाचे तितकेच मानसिक आरोग्य देखील महत्वाचे. तेही सरकारचेच आद्य कर्तव्य आहे. एरवी तुमचे धोरण म्हणजे जखम एकीकडे अन् मलम दुसरीकडे असे असते. या योजनांची, धोरणांची अंमलबजावणी करणारे तुमच्या अवतीभवतीचे अधिकारी चांगले शिकले सवरलेले असतात. त्यांच्या प्रशिक्षणासाठी सरकार करोडो रुपये खर्च करीत असते. त्यांच्या बुध्दिकौशल्याचा नीट उपयोग करून घ्या. त्यांना जबाबदारी द्या, अन् त्या बरोबर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही द्या. सगळ्या किल्ल्या स्वतःच्या हातात ठेवण्यात धोरणी शहाणपण निश्चितच नाही. सर्वांना त्यांचे काम वाटून द्या. प्रत्येकाचे लक्ष्य ठरवून द्या. अन् त्या लक्ष्यपूर्तीसाठी त्यांना जबाबदार धरा. सत्तेचे, अधिकाराचे विकेंद्रीकरण फार गरजेचे आहे.
प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. विज्ञान तंत्रज्ञानाचा विचार केला तर एकापेक्षा जास्त उत्तरे असतात. ती शोधली की सापडतात. पण तुम्हाला प्रश्न चिघळत ठेवायचे असतात. कारण सगळे प्रश्न सुटले, सोडवले तर तुमच्याकडे कोण येईल, तुमचे महत्व ते काय राहील ही भीती वाटते तुम्हाला. हा भयगंड सोडून द्या. जनतेच्या खऱ्या प्राथमिक गरजा, समस्या नीट समजून घ्या अन् त्या प्रमाणे तुमची धोरणे आखा. योजना तयार करा. अन् वेळेचे बंधन पाळून त्याची अम्मल बजावणी करा. काही गोष्टी कठीण असतात. पण अशक्य नसतात.

दोन वेगवेगळ्या घरची माणसे एकत्र संसारात आली की खडखडाट होणार. भांड्याला भांडं लागणार. इथे तर तीचाकी संसार आहे. एकमेकांच्या आशा अपेक्षा सांभाळत सरकारचे गाडे हाकायचे म्हणजे रागलोभ, रुसवेफुगवे यांचा सामना स्वाभाविक. पण हे तुम्हीच स्वीकारलेले निर्णय आहेत. अशक्य ते शक्य करून दाखवणारे नवे राजकारण, नवे नाटक सरकारी रंगमंचावर तुम्हीच आणले आहे. या नव्या नाटकाचे प्रयोग यशस्वी करणे ही देखील तुमचीच जबाबदारी आहे. कारण ही नवी सोयरीक करताना तुम्ही घरच्या वऱ्हाडी मंडळींना विचारले नव्हते. जनतेला विश्वासात घेतले नव्हते. तुम्ही तुमचे लग्न ठरवून टाकले. अन् अक्षदा टाकायला म्हणजे मतदानाला आम्हाला बोलावले. आम्हाला तुमचे सरकारी संसाराचे स्थैर्य हवे आहे. तुमच्या आज इथे, उद्या तिथे या धरसोड वृत्तीने आम्हाला हैराण केले आहे. नाती जपायची तर निष्ठा हवी. कशावर तरी श्रध्दा हवी. राज्याचा, राष्ट्राचा, म्हणजेच जनतेचा विकास याला प्राधान्य हवे. सारखे अस्थैर्य, अशांती, युद्धजन्य परिस्थिती, भविष्याविषयी अनिश्चिती या साऱ्याला सामान्य माणूस आता कंटाळला आहे. तुमच्या धरसोड वृत्तीच्या, घाणेरड्या, द्वेषमूलक राजकारणाने यापुढे आगीत तेल टाकण्याचे काम कृपया करू नका. ते तुमच्याच काय, कुणाच्याच हिताचे नाही. तुम्हाला सत्तेच्या बोहल्यावर सजवून, चढवून जनतेने एक सुवर्णसंधी दिलीय. ती दवडू नका. मतभेद विसरा. तडजोड करायला शिका. मुख्य म्हणजे स्वतः बरोबरच दुसऱ्याच्या भावनाचा विचार करायला शिका.

हेही वाचा…भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?

तुम्हाला जनतेने दिलेल्या या संधीचा नीट उपयोग करा. उतू नका, मातू नका. अन् घेतला वसा टाकू नका एव्हढीच अपेक्षा. बाकी लई नाही मागणे! आफ्रिकन समाजात एक सुंदर तत्त्वज्ञान आहे. उबंटू. त्याचा अर्थ तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुमच्यामुळे मी आहे. मी एकटा कुणीच नाही. ही सहकाराची, एकमेकावर अवलंबून राहत पुढे वाटचाल करण्याची भावना फार मोलाची आहे. स्वतःबरोबर दुसऱ्याचे मूल्य सांभाळत सरकारी संसार करा.
नांदा सौख्यभरे!

Story img Loader