महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत शुक्रवारी न्यूझीलंड आणि आर्यलड यांच्यात मोहाली येथे सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडच्या संघासमोर सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल, तर विजयाची सुरुवात करण्यासाठी आर्यलड उत्सुक आहे.
गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत न्यूझीलंडचे पारडे जड वाटत असले तरी खळबळजनक विजय मिळवण्याचे उपजत कौशल्य आर्यलडला लाभले आहे. सुझी बॅट्स, रॅचेल प्रिस्ट, सारा मॅक्ग्लाशेन ही फलंदाजांची फौज, तर लेघ कॅस्पेरेक, ली ताहुहू यांचा भेदक मारा ही न्यूझीलंडचे बलस्थाने आहेत. युवा आणि अनुभवी खेळाडूंनी मोट बांधल्याने आर्यलडचा संघही कागदावर मजबूत दिसत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
न्यूझीलंडचा सामना आर्यलडशी
महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत शुक्रवारी न्यूझीलंड आणि आर्यलड यांच्यात मोहाली येथे सामना रंगणार आहे.

First published on: 18-03-2016 at 04:46 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens world t20 2016 new zealand vs ireland