अमेझॉन सेल सुरू झाला आहे आणि या सेलवर अ‍ॅपल आणि सॅमसंगच्या प्रिमियम फोन्सवर मोठी सूट मिळत आहे. अ‍ॅपला आणि सॅमसंग या दोन्ही फोन कंपन्यांमध्ये स्मार्टफोनच्या बाबतीत मोठी स्पर्धा होत राहाते. मात्र ग्राहक या दोन्ही फोन्सना त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे पसंती देतात. दरम्यान अमेझॉन सेलवर सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली आणि भरपूर वैशिष्ट्यांनी संपन्न Samsung galaxy s 22 ultra 5g हा फोन देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, या फोनवर २४ टक्क्यांची सूट मिळत आहे.

अतिरिक्त ८ हजार रुपयांची सूट

अमेझॉनवर फोनची लिस्टिंग प्राईज १ लाख ३१ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र या फोनवर २४ टक्क्यांची मोठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत ९९ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. केवळ इतकेच नव्हे तर या फोनवर तुम्हाला आणखी ८ हजार रुपयांची तातडीची सूट मिळू शकते. कोणत्याही बॅकेच्या कार्डाने पेमेंट केल्यास ही सूट लागू होईल. त्यामुळे, या फोन खरेदीतून ग्राहकांची आणखी बचत होणार आहे.

(RBI ची ‘ही’ सूचना लगेच पाळा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून कार्डद्वारे व्यवहार करताना येऊ शकतात समस्या)

एक्सचेंज ऑफर मध्ये मिळणार इतका फायदा

फोन एक्सचेंज केल्यास सॅमसंग गॅलक्सी एस २२ अल्ट्रावर २२ हजार २५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. एकंदरीत हा फोन घेण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सेलमध्ये सॅमसंगचे इतरही मॉडेल्सची जोरदार विक्री सुरू आहे. यामध्ये ग्राहकांकडून गॅलक्सी सिरीजच्या स्मार्टफोनला अधिक पसंती दिली जात आहे.

Samsung galaxy s 22 ultra चे फीचर

फोनमध्ये १२ जीबीची रॅम आणि २५६ जीबीची मोठी स्टोरेज देण्यात आली आहे. इतक्या स्टोरेजमध्ये तुम्हाला भरपूर माहिती, फाईल्स, फोटो साठवून ठेवता येईल. फोनमध्ये ४ एनएम प्रोसेसर देण्यात आला. हा वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे फोनवर कामे वेगाने होतील. फोनला अमोल्ड डिस्प्ले असून फोन फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.

(Flipkart : फ्लिपकार्ट सेलला गालबोट, iphone 13 चे ऑर्डर झाले कॅन्सल, तक्रारकरते म्हणाले हा सेल..)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोनला मागे चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यातील एक कॅमेरा १०८ मेगपिक्सेलचा आहे, एक १२ एमपी, १० एमपी आणि १० एक्स ऑप्टिकल झूम असलेला १० एमपी असे ४ कॅमेरे चांगले छायाचित्र निघण्यासाठी देण्यात आले आहेत. फोन ५ हजार एमएएचच्या बॅटरीसह येतो.