वनप्लस स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लसच्या प्रीमियम फोनवर एक उत्तम ऑफर आहे. OnePlus 10T 5G हा फोन नवनवीन अद्ययावत फिचर्ससह सुसज्ज आहे. पण हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑनलाईन शॉपिंग अॅमेझाॅन वरून बंपर डिस्काउंट ऑफरसह हा फोन खरेदी करू शकता. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. ५ हजार रुपयांच्या झटपट सूटसह हा फोन तुमचा होऊ शकतो. या सवलतीसाठी, तुम्हाला एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागतील. कंपनी या फोनवर १४,०५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

OnePlus 10T 5G स्मार्टफोन ‘असा’ आहे विशेष

OnePlus 10T 5G डिस्प्ले: OnePlus 10T 5G मध्ये ६.७-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच, याला Corning Gorilla Glass संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्याच्या डिस्प्लेचं रिझोल्यूशन २४१२ X १०८० पिक्सल आहे आणि ते HDR 10+, sRGB, Display P3, 10-bit कलर डेप्थसाठी सपोर्ट करतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन २ व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. बेस व्हेरियंटमध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि टॉप व्हेरिएंटमध्ये १२ जीबी रॅम + २५६ जीबी इंटरनल स्टोरेज समाविष्ट आहे. डिव्हाइसमध्ये Snapdragon ८ Gen १ प्रोसेसर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Android १२ वर आधारित OxygenOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

आणखी वाचा : Vodafone-Idea क्रमांकावर Amazon Prime आणि Disney+Hotstar मोफत कसे मिळवाल? जाणून घ्या प्रक्रिया

OnePlus 10 Pro 5G कॅमेरा : OnePlus चा हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह सादर करण्यात आला आहे. यात मागील बाजूस 48MP मेन कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 8MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरासह सादर करण्यात आला आहे. यात अल्ट्रा HDR, ड्युअल व्ह्यू व्हिडीओ, मूव्ही मोड, प्रो मोड, पोर्ट्रेट मोड, टाईमलॅप्स यांसारखे अनेक कॅमेरा फिचर्स देण्यात आले आहेत.

OnePlus 10 Pro 5G बॅटरी : या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे, जी ५०W AIRVOOC आणि ८०W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि यूएसबी टाईप सी चार्जिंग पोर्टसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A golden opportunity to buy a oneplus smartphone at a cheap price 14000 will save pdb
First published on: 03-11-2022 at 16:30 IST