एअरटेल आणि रिलायन्स जीओ प्रमाणेच, व्होडाफोन आयडियाच्या अनेक योजना आहेत, ज्या अॅमेझॉन प्राइमआणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवांमध्ये विनामूल्य प्रवेश देतात. जर तुम्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश समाविष्ट असलेल्या योजना शोधत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. या स्ट्रीमिंग सेवांमध्ये प्रवेश करण्याव्यतिरिक्त, Vi मोफत SonyLiv प्रीमियम सदस्यता, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश, ZEE5 प्रीमियम सदस्यता, Vi Movies आणि TV अॅपमध्ये प्रवेश आणि बरेच काही यासारखे फायदे देखील देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोफत ओटीटी अॅप्ससह व्होडाफोन आयडिया प्रीपेड योजना
व्होडाफोन सहा योजना ऑफर करते जे डिस्ने + हॉटस्टार मोबाईलवर विनामूल्य प्रवेश देतात. सर्वात स्वस्त प्लॅन जो तुम्हाला तीन महिने मोफत डिस्ने + हॉटस्टार मोबाईल देतो त्याची किंमत ३९९ रुपये आहे आणि तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता यासोबत दररोज २.५ जीबी मोबाइल डेटा मिळतो.

आणखी वाचा : खुशखबर! सॅमसंगचा ‘हा’ महागडा फोन झाला १० हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या फिचर्स…

व्होडाफोन-आयडिया पोस्टपेड योजना

  • Disney+Hotstar मोबाईलचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन देणार्‍या इतर प्लॅनची ​​किंमत ४९९ रुपये आहे, आणि २ जीबी मोबाईल डेटा प्रतिदिन, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २८-दिवसांची वैधता यासारखे फायदे देतात.
  • ५०१ रुपयांची योजना या ताज्या प्लॅनमध्ये, कंपनीकडून ९० जीबी डेटा आणि अमर्यादित डेटाचा लाभ दरमहा अमर्यादित कॉलिंग आणि ३ हजार मोफत एसएमएससह दिला जात आहे. त्याच वेळी, ओटीटी फायद्यांबद्दल सांगायचे तर, यामध्ये ग्राहकांना Amazon Prime Video सहा महिन्यांसाठी, Disney Hotstar एक वर्षासाठी आणि Vi Movies आणि TV अॅप सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
  • ७०१ रुपयांची योजना या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा अमर्यादित डेटा आणि ३,००० एसएमएस प्रति महिना मोफत व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच, प्लॅनमध्ये कंपनी ६ महिन्यांसाठी मोफत Amazon Prime Video आणि Disney Hotstar सुपर सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी देत ​​आहे.

आणखी वाचा : Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या ‘या’ स्वस्त प्लॅन्समध्ये दररोज २ जीबी पर्यंत डेटा आणि मोफत काॅलिंगसह मिळेल बरचं काही…

अॅमेझॉन प्राइम सदस्यत्व कसे सक्रिय कराल ?
– तुमचा Vodafone नंबर वापरून Vi अॅपमध्ये लॉग इन करा आणि ‘माय खाते’ वर जा आणि ‘सक्रिय योजना आणि सेवा’ विभाग तपासा.

– आता, तुम्ही अॅप इन्स्टॉल केले नसल्यास, पेज तुम्हाला Amazon Prime अॅप स्टोअर पेजवर घेऊन जाईल जेथे तुम्ही अॅप इंस्टॉल करू शकता.

– एकदा तुम्ही अॅप इंस्टॉल केल्यानंतर, तुमच्या विद्यमान खात्यासह लॉग इन करा किंवा एक नवीन तयार करा आणि सदस्यत्व आपोआप सक्रिय होईल.

Disney+Hotstar सदस्यत्व कसे सक्रिय कराल ?
– तुमच्या Vodafone-Idea नंबरवर Disney+Hotstar सदस्यत्व सक्रिय करणे खूपच सोपे आहे. एकदा तुम्ही तुमचा नंबर डिस्ने+हॉटस्टारचा अॅक्सेस असलेल्या प्लॅनसह रिचार्ज केल्यानंतर, सदस्यता आपोआप सक्रिय होते.

– तुम्हाला फक्त मोबाइल अॅप इन्स्टॉल करायचे आहे किंवा प्लॅटफॉर्मच्या वेब व्हर्जनवर जा, तुमचा व्होडाफोन-आयडिया क्रमांक आणि त्यानंतर येणारा ओटीपी एंटर करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get free amazon prime and disneyhotstar on your vodafone idea number pdb
First published on: 03-11-2022 at 15:37 IST