दरवर्षी व्हॉट्सअ‍ॅप अनेक अकाउंट्स ब्लॉक किंवा बॅन करते. आता, व्हॉट्सअ‍ॅप अशा युझर्सना अ‍ॅप वापरण्याची दुसरी संधी देऊ इच्छित आहे. व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर जारी केले आहे, जे अशा युझर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते, ज्यांचे अकाउंट व्हॉट्सअ‍ॅपने बॅन किंवा ब्लॉक केले आहे. हे यूजर्स आता त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनब्लॉक करू शकतील.

व्हॉट्सअप बीटा इन्फो (डब्यूए बीटा इन्फो) च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नव्या फीचरमुळे ज्या युजर्सचे अकाउंट ब्लॉक किंवा बॅन करण्यात आले आहे ते त्यांचे अकाउंट परत मिळवू शकतील. हे करण्यासाठी, युझर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि ते त्यांचे अकाउंट डिलीट केल्याशिवाय परत मिळवू शकतील. सध्या हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर दिसत आहे.

लवकरच WhatsApp वरही मिळणार अवतार फीचर; जाणून घ्या कसे करणार काम

ब्लॉक केलेले खाते पुन्हा वापरता येणार

व्हॉट्सअप बीटा इन्फो (डब्यूए बीटा इन्फो) च्या रिपोर्टमध्ये, असे सांगण्यात आले आहे की युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवरच एक पर्याय मिळेल, ज्यामुळे ते त्यांचे ब्लॉक केलेले खाते परत मिळवू शकतील. युजर्सना अ‍ॅपवर एक पर्याय दिला जाईल ज्यामुळे ते व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टशी बोलू शकतील आणि रिव्ह्यूसाठी रिक्वेस्ट करू शकतील.

रिक्वेस्ट केल्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट तुमचे अकाउंट पडताळेल आणि अ‍ॅपच्या अटी आणि नियमांनुसार युजरच्या खात्यावर कोणतीही बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी होत आहे का, हे तपासेल. अकाउंट वैध असल्याचे आढळल्यानंतर तुमचे खाते तुम्हाला पुन्हा वापरता येईल. हे फीचर येत्या आठवड्यात आयओएस बीटासाठी देखील जारी केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फीचरशिवाय, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप सपोर्टला मेल करून तुमचे खाते परत मिळवण्याची विनंती करू शकता. उर्वरित युजर्ससाठी ते कधी रिलीज केले जाऊ शकते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.