scorecardresearch

तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ टिप्स वाचाच

अनेकदा स्मार्टफोनचा ब्लास्ट झाल्याच्या घटनाही आपण ऐकतो. मात्र फोनमध्ये असे काय असते ज्यामुळे त्याचा स्फोट होतो?

5-useful-tips-to-prevent-smartphone-explosion
अशा काही पद्धती आणि खबरदारी आहे ज्याद्वारे आपण स्मार्टफोनचा ब्लास्ट होण्यापासून रोखू शकतो. (प्रातिनिधिक फोटो)

स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल आपण घरातील किराणा मागवण्यापासून ते विजेचे बिल भरण्यापर्यंत सर्वच कामे फोन वरून करतो. परंतु अनेकदा स्मार्टफोनचा ब्लास्ट झाल्याच्या घटनाही आपण ऐकतो. मात्र फोनमध्ये असे काय असते ज्यामुळे त्याचा स्फोट होतो. तथापि, अशा काही पद्धती आणि खबरदारी आहे ज्याद्वारे आपण स्मार्टफोनचा ब्लास्ट होण्यापासून रोखू शकतो.

  • आपला स्मार्टफोन खूप वेळासाठी चार्ज करू नये. म्हणजेच रात्रभर फोन चार्जिंग लावून ठेवू नये. अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत की ज्यामध्ये फोन रात्रभर चार्जला ठेवल्याने फोनचा ब्लास्ट झाला. जेव्हाही तुम्ही फोन चार्ज कराल तेव्हा फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावर तो चार्जिंगवरून काढून टाका.
  • फोन चार्ज होत असताना फोनवर कोणताही मूव्ही बघू नये किंवा गेम खेळू नये. असे करणे घातक ठरू शकते. यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरीचे तापमान वाढू शकते. असेही, चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान आधीच वाढलेले असते आणि तो गरम झालेला असतो. त्यामुळे असे करणे धोकादायक ठरेल.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

  • आपला फोन नेहमी त्याच कंपनीच्या ओरिजिनल चार्जरने चार्ज करावा. कोणत्याही दुसऱ्या कंपनीचा किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज करू नये. हे देखील फोनसाठी हानिकारक ठरू शकते.
  • काही वेळा उत्पादनातील दोषामुळे फोनचा स्फोट होतो. अनेकवेळा फोनमध्ये दिलेल्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे फोनचा स्फोट होतो. सदोष घटक किंवा अयोग्य असेंब्लीमुळे बॅटरी खराब होऊ शकते आणि स्फोट होऊ शकते. असे म्हटले जाते की स्वस्त बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.
  • स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बॅटरीची भौतिक स्थिती. कधीकधी फोन खाली पडतो आणि त्यामुळे बॅटरी खराब होते. यामुळे बॅटरीची रासायनिक किंवा अंतर्गत यांत्रिक रचना बदलते आणि यामुळे शॉर्ट सर्किट, बॅटरी जास्त गरम होणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. बॅटरी खराब झाल्यानंतर ती अनेक वेळा फुगते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Afraid of your smartphone exploding then read these tips pvp