एअरटेल लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडुन सतत नवनवे रिचार्ज प्लॅन लाँच केले जातात. यामध्ये कमी किंमतीत सर्वात जास्त ऑफर्स कोणत्या रिचार्ज प्लॅनवर दिली जात आहे, यासाठी स्पर्धा सुरू असते. एअरटेलच्या अशाच एका रिचार्ज प्लॅनची सध्या चर्चा सुरू आहे. या रिचार्ज प्लॅनवर एक दोन नव्हे तर चक्क १६ ओटीटी ॲप्सचे मोफत सब्सक्रिपशन देण्यात येत आहे. काय आहे रिचार्ज प्लॅनची किंमत आणि यावरील संपूर्ण ऑफर जाणून घ्या.
एअरटेलचा आकर्षक ‘एअरटेल ब्लॅक’ रिचार्ज प्लॅन
- एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत ६९९ रुपये आहे.
- या प्लॅनवर लँडलाईनवर अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड डेटा उपलब्ध होतो.
- या रिचार्ज प्लॅनवर ३०० हून अधिक डीटीएच चॅनेलचे सबस्क्रीप्शन मिळवण्यासाठी अधिकचे ३०० रुपये द्यावे लागतील.
- डिज्नीप्लस हॉटस्टार, एअरटेल एक्स्ट्रीम यासह १२ ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रीप्शन मिळते.
- हा प्लॅन ३० दिवसांसाठी उपलब्ध होतो.
- एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही हा रिचार्ज करू शकता.