सणासुदीच्या निमित्ताने लोक नवनवीन वस्तूंची खरेदी हमखास करतात. तर ही बाब लक्षात घेऊन विविध कंपन्या नवनवीन ऑफर्स ग्राहकांसाठी घेऊन येतात. तर उद्या ९ एप्रिल २०२४ रोजी हिंदू नव वर्षाची सुरुवात होईल आणि गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल, तर या निमित्त ॲमेझॉनसुद्धा ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स घेऊन आला आहे. १५ एप्रिलपर्यंत हा सेल ॲमेझॉनच्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर लाईव्ह असणार आहे. तर या सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर किती सूट असणार आहे चला पाहू.

ॲमेझॉन सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी रिअलमी, BIBA, सॅमसंग, फिलिप्स, वन प्लस आणि इतर बऱ्याच प्रसिद्ध ब्रँड्सवर ऑफर देते आहे.

एथनिक वेअर –

ॲमेझॉन कंपनी पुरुष आणि महिला दोघांसाठी एथनिक वेअरवर खास ऑफर देत आहे. जर तुम्हाला एथनिक वेअरवर जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर ही ॲमेझॉन ऑफर तुमच्यासाठी आहे, कारण इथे तुम्हाला कमी किमतीत एथनिक वेअरवरचे चांगले पर्याय दिले जातील.

हेही वाचा…नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी?

महिलांसाठी कांजीवरम सिल्क, बनारसी सिल्क आणि बऱ्याच सिल्क साड्या; तर सलवार कुर्ते आणि इंडो-वेस्टर्न स्टाइलच्या कपड्यांवरही तुम्हाला ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. महिलांचे पोशाख दागिन्यांशिवाय नेहमीच अपूर्ण असतात. त्यामुळे ॲमेझॉन ही बाब लक्षात घेऊन ज्वेलरीवरसुद्धा खास सवलत देते आहे. ५९९ रुपयांच्या आतमध्ये गोल्ड-प्लेटेड (Gold-plated) ज्वेलरी आणि चांदीच्या दागिन्यांवर ६० टक्के सूट या सेलमध्ये देण्यात आली आहे. एकूणच तुम्हाला किमान २० टक्के ते ५० टक्क्यांपर्यत सूट मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फेस्टिव्हलमध्ये पुरुषांचे कॉटन-प्रिंट केलेले कुर्ते, लखनवी कुर्ते, हाफ-स्लीव्ह शॉर्ट कुर्ते आणि बरेच काही ३० टक्के कमीत कमी सवलतीत उपलब्ध आहेत. हे ५० टक्के ॲनालॉग (analog) गोल्ड-डायलचे घड्याळ, ॲनालॉग सिल्व्हर-डायल बँड स्टेनलेस स्टीलचे घड्याळ, ॲनालॉग मल्टी-कलर डायल घड्याळे आणि बरेच काही यांसारखी एथनिक घड्याळेदेखील या सेलमध्ये उपलब्ध आहेत.