Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेमध्ये असून, सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत या कंपनीमधून हजारो कमर्चाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. मात्र टेक्नॉलॉजी कंपनी असणाऱ्या Apple ने भारतामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Apple ने भारतामध्ये गेल्या १९ महिन्यांमध्ये तब्बल १ लाख नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यानंतर ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये ब्ल्यू कॉलर जॉबची सर्वात मोठी निर्माती बनली आहे. भारतातील एक लाख नोकऱ्या या Apple च्या भारतातील प्रमुख विक्रेते आणि त्यांच्या पुरवठादारांनी निर्माण केल्या आहेत. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: Google ची नोकरी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याने मांडली व्यथा; म्हणाली, “माझ्या ६ वर्षाच्या मुलीला…”

भारत सध्या मेक इन इंडिया अंतर्गत अनेक योजना देशभरात राबवत आहे. त्यामधीलच एक PLI योजना भारतामध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आली. आता ज्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत त्या नोकऱ्या या PLI योजना लागू झाल्यानंतरच झाल्याचे सांगितले जात आहे. Foxconn Hon Hai, Pegatron आणि Wistron हे iPhone असेंबल करणारे तीन विक्रेते आहेत. या तिघांनी मिळून ६० टक्के नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.

उर्वरित नवीन नोकऱ्या या Apple च्या इकोसिस्टमद्वारे निर्माण केल्या आहेत. ज्यामध्ये कंपोनंट आणि चार्जर सप्लायर यांचा समावेश आहे. यामध्ये पुरवठादारांनी ४०,००० नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यामध्ये Tata Electronics, Salcomp, Avery, Foxlink, Sunvoda आणि Jabil या कंपन्यांचा समावेश आहे. हे आकडे Apple इकोसिस्टममधील तीन विक्रेते आणि कंपन्यांवर आधारित आहेत ज्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडे नियमितपणे रोजगार आकड्यांची नोंदणी करणे आवश्यक असते.

हेही वाचा : VIDEO: Snapchat ने लॉन्च केला चॅटजीपीटीवर आधारित भन्नाट My AI चॅटबॉट, म्हणाले ”सध्या फक्त…”

टाटा इलेक्ट्रॉनिक्सने पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे. हे अ‍ॅपलचे यांत्रिक भागांसाठी प्रमुख घटक पुरवठादार आहे. याशिवाय Salcomp, Jabil, Foxlink आणि Sunvoda मध्ये ११,००० पेक्षा आधी कर्मचारी काम करत आहेत. ६ ऑक्टोबर २०२० रोजी केलेल्या सरकारी प्रेस रिलिझमध्ये PLI अंतर्गत पाच वर्षांमध्ये एकूण २,००,००० थेट नोकऱ्या निर्माण होतील असा सरकारचा अंदाज होता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple in india create 1 lakh jobs in 19 months central government pli scheme tamilnadu and karnataka tmb 01
First published on: 28-02-2023 at 13:28 IST