scorecardresearch

अ‍ॅप्पल आयफोन १४ फिजिकल सिम कार्डशिवाय होणार लॉंच, जाणून घ्या काय आहे ई-सिम तंत्रज्ञान

अ‍ॅप्पल आयफोन १४ सिरीजमध्ये फक्त ई-सिम सेवेचा पर्याय उपलब्ध असेल अशी चर्चा आहे.

ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये स्थापित केलेले व्हर्च्युअल सिम आहे.(photo credit: fianancial express)

अ‍ॅप्पल कंपनीच्या आयफोन १५ सीरीजमध्ये फिजिकल सिम कार्ड सपोर्ट नसेल, अशी चर्चा होती. आयफोन १५ ही सिरीज २०२३ मध्ये लॉंच होणार आहे. आयफोन १५ हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असू शकतो. मात्र आता असे सांगण्यात येत आहे की अ‍ॅप्पल आयफोन १४ सीरीजमध्ये सिम कार्ड स्लॉट नसेल. अ‍ॅप्पल त्यांच्या नवीन आयफोन १४ या सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिम पर्याय वापरणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओ या तिन्ही टेलिकॉम कंपन्या भारतात ई-सिम सेवा देतात.

अ‍ॅप्पलने यापूर्वीच ई-सिम फीचर असलेले स्मार्टफोन लॉंच केले आहेत. कंपनीने सर्वप्रथम आयफोन XS आणि आयफोन XS Max साठी ई-सिम फीचर लाँच केले. नुकत्याच लॉंच झालेल्या आयफोन १३ सीरीजमध्ये कंपनीने फिजिकल सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त ई-सिमचा पर्याय दिला आहे. या फोनमध्ये तुम्ही दोन सिम कार्ड वापरू शकता, त्यापैकी एक फिजिकल असेल आणि एक ई-सिम कार्ड असेल. नवीन आयफोन १४ सीरीजमध्ये फक्त ई-सिमचा पर्याय उपलब्ध असेल असे सांगण्यात येत आहे.

अ‍ॅप्पल आयफोन १४ सिरिजमध्ये ई-सिम सेवा

अ‍ॅप्पल आयफोन १४ सिरीजमध्ये फक्त ई-सिम सेवेचा पर्याय उपलब्ध असेल अशी चर्चा आहे. तसेच आयफोन १४ सिरीजचा एक प्रकार सिम कार्ड स्लॉटसह येऊ शकतो. हा प्रकार खास त्या टेलिकॉम ऑपरेटरसाठी आणला जाईल जे ई-सिम सेवा देत नाहीत. आयफोन १४ सीरीजमध्ये ई-सिम देण्यामागील कारण हे देखील असू शकते की कंपनी त्यांची पुढील सीरीज पूर्णपणे वॉटरप्रूफ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात असे म्हटले जात आहे की तुम्ही आयफोन १४ सीरीजचा बराच काळ पाण्यात वापर करू शकाल.

ई-सिम म्हणजे काय?

रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया, आणि एअरटेल भारतात ई-सिम सुविधा देत आहेत. ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये स्थापित केलेले व्हर्च्युअल सिम आहे. हे अगदी प्रत्यक्ष सिम कार्ड सारखे कार्य करते. जर तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केला तर तुम्हाला फोनमध्ये कोणतेही कार्ड घालावे लागणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple iphone 14 will be launched without physical sim card find out what is e sim technology scsm

ताज्या बातम्या