Apple Production In India: स्मार्टफोनसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. अशातच चीनसह इतर देशांचे बिघडते संबंध पाहता केवळ विक्रीसाठीच नव्हे तर उत्पादक म्हणूनही आघाडीच्या स्मार्टफोन कंपनी भारताला प्राधान्य देत आहेत. अशातच एक मोठी व नामी संधी टाटा समूहाच्या हाती आल्याचे दिसत आहे. टाटा समूह भारतातील आयफोन निर्माता कंपनी विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुप तैवानची कंपनी ताब्यात घेऊन आयफोन उत्पादन वाढवू भारतात वाढवू इच्छित आहे.

अॅपलला कसा होणार फायदा?

चीनमध्ये कोविडची वाढती प्रकरणे आणि त्यामुळे निर्बंध सुरूच आहेत परिणामी अॅपलला याचा फटका बसत आहे. यामुळेच अॅपल कंपनी आपला व्यवसाय चीनमधून इतर देशात नेण्याच्या तयारीत आहे. अॅपल दरवर्षी चीनमधून भारतात सुमारे ३,७०, ००० युनिट आयफोन विक्री करते. हा आकडा २०२२ मध्ये साधारण ५, ७०, ००० इतका होऊ शकतो. तसेच, चीनच्या तुलनेत भारतात उत्पादन खर्च कमी आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अॅपलला भारतात उत्पादन हे फायदेशीर ठरू शकते .

India-US on Chabahar Port deal
Chabahar Port Agreement: इराणशी सहकार्य करणाऱ्यांना फळं भोगावी लागतील! अमेरिकेची भारताला गर्भित धमकी
China Becomes India Top Trade Partner
­­­­अग्रलेख : डोळे वटारता वटारता…
Paper ballot vs Electronic Voting Machines difference
Lok sabha elections : जाणून घ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि बॅलेट पेपर्समधील फरक
2024 Force Gurkha launch
Mahindra Thar चा खेळ संपणार? १० सीटर कार आणल्यानंतर फोर्सची Gurkha नव्या अवतारात देशात दाखल
Toyota Rumion G automatic variant launch
Maruti Ertiga, Kia Carens समोर तगडं आव्हान, टोयोटाच्या MPV कारचा नवा व्हेरिएंट देशात दाखल, किंमत फक्त…
MDH Masala News
‘एमडीएच’चे मसाले सुरक्षित आहेत का? परदेशात बंदी घातल्यानंतर कंपनीने केला खुलासा
viral video of youtuber enjoying street massage
Video : अमेरिकन यूट्युबरला पडली भारतीय ‘मसाज’ची भुरळ! “याला कामावर घ्या…” चक्क इलॉन मस्ककडे केली मागणी
Everest fish curry masala has pesticide detection
एव्हरेस्ट फिश करी मसाल्याविरुद्ध मोठी कारवाई; जास्त सेवनाने शरीराचे किती व कसे नुकसान होते?

विश्लेषक जेपी मॉर्गन यांच्या अहवालानुसार, २०२५ सालापर्यंत जवळपास २५ टक्के आयफोनचे उत्पादन भारतात सुरू होईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, पुढील तीन वर्षांत जगभरात विकले जाणारे प्रत्येक चौथे अॅपल उत्पादन मेड इन इंडिया असेल. तर या वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया ऍपल उत्पादनांचा हिस्सा जवळपास ५ टक्के असू शकतो.

दरम्यान, हा करार झाला तर टाटा आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरेल. सध्या, चीन आणि भारतातील विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन सारख्या उद्योगातील दिग्गजांकडून अॅपलचे आयफोन तयार केले जातात. भारतात आयफोनचे उत्पादन सुरु झाल्यास किमतीत सुद्धा बराच फरक दिसून येईल.