अलिकडे आयफोनमधील काही फीचर्स वापरताना समस्या येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी कॅमेराबाबत युजर्सच्या तक्रारी होत्या, त्यानंतर अ‍ॅपलने नवे अपडेट दिले होते. आता वायफाय संबंधी तक्रारी येऊ लागल्यानंतर अ‍ॅपल आयओएस १६.१.१ अपडेट लाँच करणार आहे. आयफोन युजरनुसार, अपडेटमध्ये नवे अपग्रेड मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोन अपडेट केल्यानंतर अनेक आयफोन युजर्सकडून वायफाय कनेक्टिव्हिटी संबंधी तक्रारी येत होत्या. तसेच, पोस्ट केलेल्या जाहिरातीबाबत माहिती मिळवताना जाहिरातदारांना देखील समस्या येत होती. एका अहवालानुसार, या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी अ‍ॅपल १६.१.१ अपडेटवर काम करत आहे.

(रिलायन्स जिओने 5G सेवेचा केला विस्तार; ‘या’ दोन शहरांमध्ये सुरू केली सेवा)

अहवालानुसार, १६.१ अपडेट केल्यानंतर आयफोन वायफायपासून डिस्कनेक्ट होतो, अशी तक्रारी ट्विटर आणि रेड्डिटवर आहे. स्टँडबायवर स्थिर असताना आयफोन वायफायपासून डिस्कनेक्ट होतो, असा दावा काही आयफोन युजर्सनी केला आहे. या पार्श्वभूमीवर काहींनी नेटवर्क सेटिंग्स रिसेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फार अवघड असल्याचेही काहींनी सांगितले आहे.

गेल्या महिन्यात कंपनीने एसकेएडी नेटवर्क ४.० सह आयओएस १६.१ अपडेट सादर केले होते. याने जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरातीचे यश मोजण्यात मदत झाली होती. मात्र, आता कंपनी एसकेएडी नेटवर्क या अ‍ॅडव्हर्टायझिंग फ्रेमवर्कसंबंधी समस्येला दूर करण्यासाठी नव्या अपडेटवर काम करत असल्याचे समजले आहे.

(भारतात TWITTER BLUE सेवा सुरू; दर महिन्याला किती पैसे खर्च करावे लागतील? जाणून घ्या)

दरम्यान अ‍ॅपलने जगातील काही भागांमध्ये आयओएस १६.२ बिटा देण्यास सुरुवात केली आहे. याने भारतातील काही निवडक आयफोन युजर्सना आपल्या आयफोनवर ५ जी सेवा वापरता येणार आहे. सध्या भारतात आयफोन १२, १३, १४ सिरीज आणि आयफोन एसई २ हे आयफोन ५जी नेटवर्कशी सुसंगत होतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple will rollout new ios 16 11 to fix wifi bug and ad related issue ssb
First published on: 11-11-2022 at 16:30 IST