Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लॉन्च करत असते. Apple या वर्षातील सर्वात मोठी वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) २०२३ ५ जून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. अ‍ॅपलचा WWDC 2023 इव्हेंट ५ जून ते ९ जून २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. Apple चे कीनोट भारतात ५ जून रोजी रात्री १०.३० pm IST वाजता सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

WWDC २०२३ मध्ये अ‍ॅपल कंपनी iOS 17, macOS 14, watchOS 10, tvOS, त्याचे बहुप्रतिक्षित AR/VR हेडसेट, 15-इंच MacBook Air यांसारख्या प्रॉडक्ट्सच्या लॉंचिंगबद्दल घोषणा करू शकते. तसेच तुम्ही WWDC २०२३ इव्हेंट भारतात कुठे लाईव्ह पाहू शकता हे जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त thequint ने दिले आहे.

हेही वाचा : ५ जूनपासून सुरु होणार Apple चा WWDC इव्हेंट; मॅकबुक एअरसह लॉन्च होऊ शकतात ‘हे’ प्रॉडक्ट्स, जाणून घ्या कुठे पाहता येणार लाईव्ह

अ‍ॅपल WWDC २०२३ ची तारीख आणि वेळ

अ‍ॅपलचा इव्हेंट ५ जून ते ९ जून या दरम्यान होणार आहे. हा इव्हेंट भारतामध्ये रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचा शेवट ९ जून रोजी होणार आहे. अ‍ॅपलचा किनोट apple.com , Apple डेव्हलपर अ‍ॅप , अ‍ॅपल टीव्ही आणि YouTube वर पाहता येणार आहे.

अ‍ॅपल WWDC २०२३ कसा पाहायचा ?

१. WWDC २०२३ इव्हेंट तुम्ही अ‍ॅपलची वेबसाईट, अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅप, अ‍ॅपल डेव्हलपर आणि युट्युब वर पाहू शकणार आहात.

२. Apple India च्या http://www.apple.com वेबसाइटला भेट द्या आणि WWDC 2023 इव्हेंट पेज पाहावे.

३. तुम्ही कोणत्याही Mac, iPhone, iPad किंवा iPod वर किंवा सफारी ब्राउझर किंवा Chrome सारख्या अन्य ब्राउझरवर WWDC कीनोट पाहू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple wwdc 2023 event start 5 june to 9 june hot to watch live check all details tmb 01
First published on: 05-06-2023 at 10:46 IST