इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या मीम्सकडे केवल मज्जा म्हणूनचं नाही तर त्याकडे करियरची एक संधी म्हणूनही पाहू शकता. तुम्हाला जर चांगले मीन्स बनवता येत असतील तर आता त्यातून बक्कळ पैसे कमवण्याची एक सुवर्ण संधी चालून आली आहे. यातून दरमहा तुम्ही एक लाख रुपये कमावू शकताच वर तुम्हाला अनेक सेवाही मोफत मिळत आहेत. बेंगळुरु स्थित एका स्टार्टअपने ‘चीफ मीम ऑफिसर’ या पदासाठी दरमहा १ लाख रुपये महिन्याचा पेमेंट पॅकेज जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्ही देखील चांगले मीम्स क्रिएटर असाल तर या पोस्टकडे करियरची नवी संधी म्हणून पाहू शकता.

स्टॉकग्रो नावाच्या स्टार्टअपने लिक्डंइनवर ‘चीफ मीम ऑफिसर’ या रिक्त जागेसाठी एक पोस्ट केली आहे. या पोस्टची आता सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे. एवढेच नाही तर संबंधीत स्टार्टअपकडून जो कोणी व्यक्ती योग्य उमेदवार देईल त्याला मोफत आयपॅड दिला जाईल.

स्टार्टअपचा असा विश्वास आहे की, Genz मीम्सच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकणे पसंत करतात. म्हणूनच ते मिम एक्सपर्ट म्हणून एकाची नियुक्ती करु इच्छितात. स्टार्टअपच्या मते, योग्य उमेदवार तोच असेल जो लोकांना सध्याच्या घडामोडींची माहिती मीम्सच्या स्वरूपात पण अगदी विनोदी ढंगाने देऊ शकेल.

स्टार्टअपने पोस्टमध्ये लिहिले की, ‘चीफ मीम ऑफिसर’ या नात्याने तुम्हाला असा कंटेंट तयार करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला फक्त हसायचेच नाही तर ब्रँडचा मेसेजही योग्य प्रकारे पोहोचवता आला पाहिजे. तुम्ही यासाठी तयार असाल तर आम्ही तुमची वाट पाहत आहोत.

या पदासाठी स्टार्टअपने दरमहा एक लाख रुपये पगार देण्यात येणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. यामुळे जर तुम्ही फायनान्स जगाला मीन्सने भरलेल्या वंडरलँडमध्ये बदलण्यासाठी तयार असाल, तर आम्ही तुम्हाला आमच्या टीममध्ये घेऊ इच्छितो. आमच्यात सामील व्हा आणि गेमला पुढच्या टप्प्यावर घेऊन जा.

‘या’ व्यक्तीला मिळणार मोफत iPad

फिनटेक स्टार्टअपने दुसर्‍या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, जो व्यक्ती योग्य उमेदवार निवडून देईल त्याला एक मोफत आयपॅड जिंकता येईल. त्या व्यक्तीला फक्त त्यांच्या मित्रांना ही पोस्ट टॅग करावी लागेल आणि एक फॉर्म भरावा लागेल. त्यांच्या एखाद्या मित्राला कामावर घेतल्यास, त्याला ज्याने रेफर केले त्या व्यक्तीला विनामूल्य iPad मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वीचे दिवस गेले जेव्हा एखाद्या कंपनीत कामासाठी मोजकीच पदं असायची. आजकाल स्टार्टअप कंपनी अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहत आहेत. त्यातून त्यांचे उत्पादन आणि सेवा ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊन शकतात. यातूनचं मीम्स क्रिएटर्स ही करियरची नवी संधी उपलब्ध झाली आहे. मीम्सच्या माध्यमातून एखाद्या ब्रँडचे उत्पादन आणि सेवा सोशल मीडियावर जास्तीत जास्त पोहचवता येते. मीम्सची पोहोच ही पोस्ट किंवा व्हिडिओंपेक्षा जास्त आहे.