OLA अ‍ॅपद्वारे राइड बुक करताना, ड्रायव्हरकडून अनेकदा विचारलं जातं, “कुठे जायचंय?”, पेमेंट मोड ऑनलाइन आहे की कॅश? जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा जर तुमची राईड ड्रायव्हरला नको असेल तर तो अनेक वेळा राईड रद्द करतो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा राइड बुक करावी लागते आणि अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता तुमच्यासोबत असं होणार नाही. कारण OLA ने आपल्या अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. यामुळे राईड बुक करण्यापूर्वी चालकाला सर्व माहिती मिळणार आहे.

राइड स्वीकारण्यापूर्वी सर्व उत्तरे मिळणार
Ola कडून सांगण्यात आलं आहे की, OLA अ‍ॅपमध्ये केलेल्या बदलांनंतर, ड्रायव्हरला राइड स्वीकारण्यापूर्वी ड्रॉप लोकेशन आणि पेमेंट कॅश आहे की ऑनलाइन याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे. त्यानंतरच ड्रायव्हर तुमची राइड स्वीकारेल.

ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, ड्रायव्हरने राइड रद्द करणे ही या मोबाइल अ‍ॅप आधारित व्यवसायाची मोठी समस्या बनली होती. कंपनीने ही समस्या आता दूर केली आहे.

आणखी वाचा : Instagram ने लॉंच केलं नवं फिचर, आता प्रोफाइलची लिंक एम्बेड करता येणार

आणखी वाचा : Income Tax Return: ITR शी आधार कार्ड लिंक करणं अगदी सोपं, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया ?

प्रवाशांना त्रास होऊ शकतो
ओलाच्या अ‍ॅपमधील बदलांमुळे प्रवाशांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. उदाहरणार्थ, ड्रायव्हरला प्रवाशांच्या पेमेंट पर्यायामध्ये समस्या असल्यास तो राइड स्वीकारणार नाही.

अशा स्थितीत, प्रवाशाला त्याच्या राईडचा शोध घेण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्याचवेळी, असं होऊ शकतं की ड्रायव्हर्सच्या अनुसार तुमचं ड्रॉप लोकेशनचे असलं तरीही तुमची राईड स्वीकारणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Ola चं सुद्धा होऊ शकतं नुकसान
जर प्रवाशांना या नव्या बदलांमुळे आपली राइड बुक करण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर प्रवाशी त्यावेळेत इतर कॅब सेवेसाठी प्रयत्न करू शकतो. अशा परिस्थितीत ओलालाही मोठ्या प्रमाणात ग्राहकांना गमवावं लागू शकतं.