Black Friday Sale 2023 : विजय सेल्सने आपल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘सायबर मंडे’, या सेलच्या तारखांची घोषणा केली आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन, ब्लूटूथ नेकबॅन्ड, टीव्ही यांसारख्या उत्पादनांवर भरपूर प्रमाणात सूट देण्यात येणार असून, या ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ आणि ‘सायबर मंडे सेल’ची कधीपासून सुरुवात होणार आहे ते पाहू.

विजय सेल्सच्या ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ आणि ‘सायबर मंडे सेल’ची तारीख :

विजय सेल्सचा ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ हा नोव्हेंबर २४ पासून सुरू होणार असून, नोव्हेंबर २६ पर्यंत सुरू राहणार आहे; तर विजय सेल्सचा ‘सायबर मंडे’ हा सेल २४ नोव्हेंबरपासून सुरू होऊन २७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

YouTube Shorts to allow 3 minute videos
आता वेगाने व्हायरल होणार तुमची रील! ६० सेकंद नव्हे, बनवा ३ मिनिटांचे YouTube Shorts; समजून घ्या, नवीन अपडेटमध्ये होणार ‘हे’ तीन बदल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
survey of the cluster scheme was halted due to public outrage
नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले
upi
त्रिनिदाद-टोबॅगोमध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध
tupperware bankrupt
Tupperware bankruptcy: अमेरिकन महिलांमुळे टपरवेअरचे नाव पोहोचले सर्वतोमुखी; त्यामागची गोष्ट जाणून घ्या
Sensex, Indexes record high, Sensex latest news,
निर्देशांकांची विक्रमी शिखरझेप! सेन्सेक्स ८५ हजारांच्या वेशीवर
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ‘आयपीओ’ला विक्रमी ३.२५ कोटींच्या बोली

या सेलचा फायदा तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच http://www.vijaysales.com यावर घेऊ शकता. त्याचसोबत जे ग्राहक बँक कार्डांचा वापर करतील त्यांना इन्स्टंट डिस्काउंटदेखील मिळेल, यामुळे उत्पादने आणखी सवलतीच्या दरात घेऊ शकता. विजय सेल्सची कोणती उत्पादने कोणत्या किमतीत मिळणार आहेत ते पाहू.

हेही वाचा : Black Friday Sale: १५ हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत ‘या’ ४ महागड्या 5G स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काउंट; पाहा डिटेल्स

विजय सेल्समधील उत्पादनांची किंमत पाहा :

१. मिवी ड्युओपॉड्स N२ TWS [mivi duopods n2 tws] इअरफोन

विजय सेल्सच्या वेबसाईटवर २४ नोव्हेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत ४९९ रुपयांमध्ये मिळणार आहेत.

२. आसूस आरओजी फोन ६

आसूस आरओजी फोन ६ हा स्मार्टफोन ४७,९९९ रुपयांना मिळणार असून त्याची मूळ किंमत ही ७१,९९९ इतकी आहे.

३. सोनी प्ले स्टेशन PS५ स्टॅंडर्ड क्रिकेट२४ बंडल

सोनी प्ले स्टेशन PS५ स्टॅंडर्ड क्रिकेट२४ बंडलची किंमत ४७,९९० रुपये इतकी आहे.

४. स्मार्ट वॉच

स्मार्ट वॉचची किंमत ही ७९० रुपयांपासून सुरू होत आहे.

५. वन प्लस बुलेट्स वायरलेस Z२

वन प्लस बुलेट्स वायरलेस Z२ ची किंमत १,९९९ रुपये इतकी आहे.

६. हेडफोन्स

हेडफोन्सची किंमत ही ८९९ रुपये इतकी आहे.

७. सांसुई ४K QLED टेलिव्हिजन [sansui 65 inch 4k qled tv]

६५ इंचाच्या सांसुई ४K QLED टेलिव्हिजनची किंमत ५१,००० रुपये इतकी आहे.

८. वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनची सुरुवात ६९९० रुपयांपासून होत आहे.

हेही वाचा : Black Friday Sale : जबरदस्त! आयफोन १५ स्वस्तात खरेदी करण्याची संधी; होईल ‘इतक्या’ रुपयांची बचत

९. इन्व्हर्टर एसी

इन्व्हर्टर एसीची सुरुवात २५,९९० रुपयांपासून होत आहे.

१०. रेफ्रिजरेटर

फ्रिज, रेफ्रिजरेटर यांची सुरुवात ७९९९ रुपयांपासून होत आहे.

११. ॲपल आयफोन १५

ॲपल आयफोन १५ ची सुरुवात ७२,९९० रुपयांपासून सुरू होत असून, एचडीएफसी बँकचे कार्ड वापरल्यास ५,००० रुपयांची अतिरिक्त सवलतदेखील मिळू शकते.

या सर्व सवलतींसह, बँकांवर कोणत्या ऑफर आहेत हे देखील पाहा :

१. एचएसबीसी बँक क्रेडिट कार्ड वरील ईएमआय : ७.५% त्वरित सूट मिळणार असून २०,००० रुपयांच्या खरेदीवर, ७५०० रुपयांची सवलत मिळणार आहे.

२. आयसीआयसीआय बँक ईएमआय/ गैर ईएमआय : ३००० रुपयांपर्यंत, ७.५% त्वरित सूट मिळणार असून १५०० रुपयांपर्यंत ५ टक्यांची त्वरित सवलत मिळणार आहे.

३. येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय : १५,००० रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर २,५०० रुपयांची सूट मिळणार असून, ५ टक्क्यांची तात्काळ सूट मिळू शकते.

४. वनकार्ड क्रेडिट कार्ड ईएमआय/गैर ईएमआय : १५,००० रुपयांच्या खरेदीवर ७,५०० रुपयांची सूट मिळणार असून, १००० रुपयांपर्यंत ५ टक्क्यांसह त्वरित सूट मिळणार आहे.