नथिंग इअरचं ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च झालं आहे. यापूर्वी नथिंग इअर 1 भारतीय बाजारात पांढऱ्या रंगात उपलब्ध होतं. सर्वात खास बाब म्हणजे याची डिझाइन ट्रान्सफरंट आहे. नथिंग इअर 1 ब्लॅक एडिशनही ट्रान्सफरंट आहे. बड्सची डिझाइन मॅट ब्लॅक असून सिलिकॉन इअरबड्स आहेत. नथिंग इअर 1 ब्लॅक एडिशनची किंमत ६,९९९ रुपये आहे. या प्रोडक्टची विक्री १३ डिसेंबरपासून फ्लिपकार्ट होणार आहे. यासोबत क्रिफ्टो करन्सीत पेमेंट करता येईल, असंही कंपनीने जाहीर केलं आहे. मात्र ही सुविधा भारतीय ग्राहकांसाठी नसणार आहे.

इअरबड्समध्ये ट्रान्सफरन्सी मोडही देण्यात आला आहे. त्यामुळे आसपासचा आवाज ऐकायचा असल्यास ऐकू शकता. या बॅटरी लाइफ ३४ तासांची असल्याचा कंपनीचा दावा आहे. बड्समध्ये टच कंट्रोल फिचरही देण्यात आलं आहे. यामुळे प्लेबॅक कंट्रोल करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नथिंग इअर 1 मध्ये११.६ एमएम डायनामिक ड्रायव्हर दिला आहे. स्वीडनच्या तरूण इंजीनिअरच्या मदतीने डिझाइन आणि डेव्हलप केलं आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.२ दिलं आहे. त्याचबरोबर एसबीसी आणि एसीसी ब्लूटूथ कोडेकला सपोर्ट करते. अँड्रॉइड आणि आयओएस दोघांना सपोर्ट करतं.