ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडुन जास्तीत जास्त ऑफर्स असणारे रिचार्ज प्लॅन्स सतत जाहीर केले जातात. सध्या मोबाईलवर कोणतेही काम करायचे असेल तर इंटरनेटची गरज भासते, त्यामुळे रिचार्ज प्लॅन निवडताना कॉलिंग ऑफरसह त्यावर डेटा किती उपलब्ध होणार हे देखील चेक केले जाते. बीएसएनएलच्या दोन रिचार्ज प्लॅन्सवर १००० जीबी डेटाची ऑफर मिळते. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत ३२९ आणि ३९९ रूपये आहे. यावर आणखी कोणते ऑफर्स आहेत जाणून घ्या.

३२९ रुपयांचा प्रीपेड ब्रॉडबँड प्लॅन

  • हा एन्ट्री लेवल ब्रॉडबँड प्लॅन आहे.
  • या प्लॅनमध्ये २० एमबीपीएसच्या स्पीड असलेले १००० जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यासह या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध होते.
  • डेटा लिमिट संपल्यानंतर २ एमबीपीएस स्पीडवर डेटा उपलब्ध होतो.

आणखी वाचा : २६ रुपये, ४९ रुपये? Jio, Vodafone, Airtel चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत जाणून घ्या

३९९ रुपयांचा प्रीपेड ब्रॉडबँड प्लॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • या प्लॅनमध्ये ३० एमबीपीएसच्या स्पीड असलेले १००० जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यासह या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध होते.
  • डेटा लिमिट संपल्यानंतर २ एमबीपीएस स्पीडवर डेटा उपलब्ध होतो.

ज्या व्यक्तींना अधिक डेटाची गरज भासते ते या रिचार्ज प्लॅन्सची निवड करू शकतात. हे दोन्ही रिचार्ज प्लॅन एका महिन्यासाठी उपलब्ध होतात.