रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने एकीकडे प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत, तर दुसरीकडे बीएसएनएल त्याचा फायदा घेत आहे. कमी किमतीत अधिक फायदे देऊन ते ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीएसएनएलकडे ११ लाख नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. त्याचवेळी जिओला याचा खूप फटका बसला. आता बीएसएनएल (BSNL) ने TCS (Tata Consultancy Services) सोबत भागीदारी केली असून आता भारतात ४ जीच्या सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र कंपनीने भारतात ४ जी सेवा लॉन्च करण्याची नेमकी तारीख जाहीर केलेली गेली नाही.

स्वातंत्र्यदिनी येऊ शकते बीएसएनएलची ४जी सेवा

नवीन अहवालांनुसार, बीएसएनएल त्यांचा ४ जीची नवीन सेवा ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास कनेक्टिव्हिटीची घोषणा करू शकते. सध्या, बीएसएनएल ३ जी कनेक्टिव्हिटी आणि ब्रॉडबँड सेवा प्रदान करते, ज्या किफायतशीर आहेत. तसेच एअरटेल, व्होडाफोन आणि जिओ सारख्या खाजगी दूरसंस्था अनेक वर्षांपासून ४जी सेवा देत आहेत, तर २०२३ मध्ये ५जी सेवा येणार आहे. संपूर्ण भारतात १ लाख दूरसंचार टॉवर्स तसेच बिहारमध्ये ४०,००० दूरसंचार टॉवर्स बसवण्याचा बीएसएनएलचा मानस आहे.

बिहारमध्ये उभारले जाणार ४० हजार टॉवर

बीएसएनएल कंझ्युमर मोबिलिटी डायरेक्टर सुशील कुमार मिश्रा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, “बीएसएनएल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सोबत ४जी सेवा देणार आहे. , तसेच “बीएसएनएलची बिहारमधील किमान ४०,००० टॉवर्ससह देशभरात १ लाख टॉवर बसवण्याची योजना आहे. ते दिल्ली आणि मुंबई येथे ४जी सेवा देखील प्रदान करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनी त्याची ४ जी कनेक्टिव्हिटी जाहीर करण्याची तयारी करत असताना, व्होडाफोन आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ सारख्या इतर दूरसंचार कंपन्यांनी देशात ५जी कनेक्टिव्हिटी चाचण्या सुरू केल्या आहेत. बीएसएनएलची ४ जी कनेक्टिव्हिटी थोडी जुनी होईल, कारण इतर कंपन्यांची ४जी सिरिज अनेक वर्षांपासून आहे. मात्र बीएसएनएलच्या या कनेक्टिव्हिटीचा ग्रामीण आणि दुर्गम भागावर चांगला परिणाम होणार आहे.