महिनाभरापूर्वी दूरसंचार कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात मोबाइल नंबर पोर्ट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसेच कंपनीचा परवडेल असा प्लान घेतला जात आहे. भारत संचार निगम लिमिटेडने त्याच्या काही प्रीपेड प्लानसह ऑफर दिली आहे. असाच एक प्लान म्हणजे टेल्कोचा ४९९ रुपयांचा प्रीपेड प्लान. या प्लानसोबत स्पेशल टेरिफ व्हाउचर ऑफर दिली आहे. त्यामुळे ९० दिवसांची वैधता मिळतते. त्यात दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. हा प्लान बीएसएनएल ट्यून्ससह अमर्यादित कॉल आणि झिंग अॅप अॅक्सेससह येतो. टेल्कोने अलीकडेच बीएसएनएल राजस्थान हँडलद्वारे या योजनेबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Airtel, Jio आणि Vi देखील ५०० रुपयांच्या खाली प्रीपेड प्लान ऑफर देते. यामध्ये वैधतेसह दैनिक डेटा आणि कॉलिंग फायदे मिळतात. एअरटेलचा ४५५ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये ६ जीबी डेटा उपलब्ध आहे. त्याची वैधता ८४ दिवस आहे. अमर्यादित कॉल आणि ९०० एसएमएस देखील मिळतात. या प्लानच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अपोलो २४/७ सर्कल, विनामूल्य ऑनलाइन कोर्स, फास्टटॅगवर १०० रुपये कॅशबॅक, विनामूल्य हॅलोट्यून्स आणि विन्क म्यूझिक यांचा समावेश आहे.

जिओचा ३९५ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. यात ६ जीबी डेटा, अमर्यादित कॉल आणि १००० एसएमएस मिळतात. प्लानचे अतिरिक्त फायदे म्हणजे जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. जिओकडे ५६ दिवसांच्या वैधतेसह दोन प्रीपेड प्लान आहेत. यात दररोज १.५ जीबी आणि २ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएसची सुविधा आहे. प्रीपेड प्लॅनची ​​किंमत अनुक्रमे ४७९ रुपये आणि ५३३ रुपये आहे. एअरटेलकडे ५६ दिवसांची वैधता असलेले दोन प्लान आहेत ज्यांची किंमत आता ४७९ रुपये आहे. या प्लानमध्ये अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएस सोबत १.५ जीबी दैनिक डेटा मिळतो. व्होडाफोन आयडियाचे दोन प्रीपेड प्लान आहेत जे ५६ दिवसांची वैधता देतात. याची किंमत ४७९ रुपये आहे. या प्लानमध्ये १.५ जीबी दैनंदिन डेटा तसेच अमर्यादित कॉल्स आणि १०० एसएमएस दररोज मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl 90 days prepaid plan with daily 2 gb data rmt
First published on: 13-01-2022 at 11:44 IST