बीएसएनएल एक सरकारी टेलीकॉम कंपनी असूनसुद्धा गेल्या काही महिन्यांतील मजबूत प्रीपेड योजनांच्या आधारे खाजगी कंपन्यांना मागे टाकत आहे. Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या कंपन्यांनी आपापल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत, तरीही बीएसएनएल आपल्या वापरकर्त्यांना स्वस्त किंमतीत प्रीपेड प्लॅन पुरवत आहे. हे लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा ५ सर्वोत्कृष्ट प्लॅनची ​​माहिती देणार आहोत जे अमर्यादित कॉलिंग प्लॅनसह येतात. त्याच वेळी, सूचीमध्ये उपस्थित असलेल्या काही योजनांमध्ये भरपूर डेटा देखील उपलब्ध आहे. तर जाणून घेऊया योजनांबद्दल अधिक माहिती.

BSNL चे ५ बेस्ट रिचार्ज

BSNL STV ९९
BSNL STV ११८
BSNL STV ३१९
BSNL PV ९९९
BSNL PV १४९९

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

( हे ही वाचा: तुम्हाला तुमचा BSNL नंबर आठवत नाहीये? जाणून घ्या तपासण्याचा सोपा मार्ग)

बीएसएनएलचा ९९ रुपयांचा प्लॅन

हे BSNL चे स्पेशल टेरिफ व्हाउचर आहे ज्याची किंमत ९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही डेटा किंवा एसएमएसचा लाभ मिळणार नाही. पण, यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत PRBT सेवा देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची कॉलर ट्यून सेट करू शकता. त्याच वेळी, या प्लॅनची ​​वैधता १८ दिवसांची आहे.

BSNL चा ११८ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्लानची किंमत ११८ रुपये आहे आणि हे एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर देखील आहे. या प्लॅनची ​​वैधता २० दिवस असून, यामध्ये दररोज ०.५ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि मोफत PRBT सेवेचे फायदे उपलब्ध आहेत. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, तुमचा इंटरनेट स्पीड ४०Kbps पर्यंत कमी होईल. मात्र, या प्लॅनमध्ये तुम्हाला एसएमएस सुविधा दिली जात नाही.

( हे ही वाचा: BSNL देतेय फक्त ६ रुपयात दररोज २ जीबी डेटा आणि मोफत कॉल; जाणून घ्या कसा घ्याल फायदा)

बीएसएनएलचा ३१९ रुपयांचा प्लॅन

जर आपण STV रुपये ३१९ च्या प्लानबद्दल बोललो तर यामध्ये यूजर्सना १०जीबी डेटा, एकूण ३०० SMS आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. त्याच वेळी, या प्लॅनची ​​वैधता ६५ दिवस आहे.

BSNL चा ९९९ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या ९९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये २०० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळतो. तसेच, मोफत पीआरबीटी सेवेचा लाभ ६० दिवसांसाठी उपलब्ध आहे. तथापि, प्लॅनमध्ये कोणताही डेटा आणि एसएमएस लाभ मिळणार नाहीत.

( हे ही वाचा: BSNLचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन पाहिलात का ? मिळणार ६ महिन्यांसाठी दररोज ३ जीबी डेटा)

बीएसएनएलचा १४९९ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता दिली जात आहे. त्याच वेळी, या वैधतेदरम्यान, ग्राहकांना एकूण २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यासोबतच प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे तसेच दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध असतील.