तुम्ही गुगल क्रोम (Google Chrome) वापरत असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडूनही याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गुगल क्रोमवरमध्ये आढळलेल्या एका त्रुटीचा फायदा हॅकर्स घेवू शकतात. धोक्याची बाब म्हणजे या त्रुटीमुळे तुमच्या डिव्हाईसचा संपूर्ण ऍक्सेस हॅकर्सच्या हातात जाण्याचीही शकयता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- UPI Charges: युपीआय व्यवहारावर आकारले जाणार शुल्क? अर्थ मंत्रालयाने नेमकं काय सांगितलं जाणून घ्या

गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी

गुगल क्रोम प्रसिद्ध ब्राऊजर आहे. परंतु, हे ब्राऊजर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. माहितीनुसार इंडियन, कंम्पूटर एमरजन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने Google Chrome डेस्कटॉप युजरसाठी ही सूचना जारी केली आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे हॅकर्स सहजरित्या तुमच्या कंप्युटरचा अॅक्सेस मिळवू शकतात. सायबर हल्लेखोर सिक्युरिटी रेस्ट्रिक्शनला बायपास करू शकतात. (CERT-IN) हे आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येते. अनेक कारणांमुळे या त्रुटी गुगल क्रोममध्ये आहेत, असं सायबर एजन्सीचं म्हणणं आहे. त्यामुळे हॅकर्स याचा फायदा घेवून टार्गेटेड सिस्टमवर क्रॉफ्टेड रिक्वेस्ट पाठवू शकतात. तसेच सायबर हल्लेखोर आर्टिबरी कोडचाही वापर करू शकतात. ही त्रुटी खूप वेगानं पसरत आहे.

गुगल क्रोम वापरकर्त्यांना तातडीनं अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनला अपडेट करण्याची गरज आहे. त्यामुळे सायबर हल्ल्याचा धोका टळू शकतो. Apple IOS, iPadOS आणि macOS मध्ये सापडलेल्या बग्ससाठीही CERT-In ने यापूर्वी सूचना दिली होती. हॅकर्स याचाही फायदा घेवू शकतात.

हेही वाचा- आता ‘No Network’ मध्येही फोनवरून करता येणार कॉल! जाणून घ्या ‘या’ जबरदस्त ट्रिकबद्दल

Google Chrome असुरक्षिततेपासून कोणाला धोका आहे?

सर्वच गुगुल क्रोम वापरकर्ते धोक्यात आहेत असे नाही. मात्र, ज्या वापरकरर्त्यांनी अद्याप गुगल क्रोम अपडेट केले नाही त्यांना हॅकर्सपासून धोका आहे. त्यामुळे भारत सरकारनेही गुगल क्रोम वापरकर्त्यांना डिवाईसला तातडीनं अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तुमचे Chrome कसे अपडेट कराल?

तुमचे Chrome अपडेट करण्यासाठी, प्रथम तुमच्या सिस्टमवर Chrome ब्राउझर उघडा. वेबच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात तीन बिंदूंवर क्लिक करा. आता Settings वर क्लिक करा. त्यानंतर त्यानंतर, ‘About Chrome’ वर क्लिक करा. आपोआप तुमचे Google Chrome ब्राउझर अपडेट करेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By indian government alert warn to google chrome users dpj
First published on: 22-08-2022 at 11:29 IST