देशातील टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक ऑफर्स आणि स्वस्त प्रीपेड प्लॅन्स आणत असतात. रिलायन्स जीओ ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी पैकी एक असून, कंपनीने तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आणला आहे. जीओ आपल्या ग्राहकांना ८४ दिवसांच्या वैधतेसह अनेक प्लॅन ऑफर करत आहे. यापैकी सर्वात स्वस्त ऑफर अमर्यादित कॉल्स आणि इंटरनेट फायदे फक्त ५ रुपये प्रतिदिन असा आहे. चला या रिचार्ज विषयी सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

८४ दिवसांच्या वैधतेसह जीओचा सर्वात परवडणारा रिचार्ज ३९५ रुपये आहे. यामध्ये अमर्यादित कॉल, १ हजार एसएमएस, जीओ अॅप्सची वैधता आणि ६ जीबी अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. येथे अमर्यादित डेटाचा अर्थ असा आहे की ६ जीबी वापर संपल्यानंतरही, तुम्ही डिस्कनेक्ट होत नाही फक्त स्पीड ६४Kbps पर्यंत खाली येतो. ज्या वापरकर्त्यांचा मोबाईल वापर सरासरी आहे आणि कॉलवर जास्त वेळ घालवतात, त्यांच्यासाठी हा Jio रिचार्ज खूप किफायतशीर आहे. त्यांना ८४ दिवसांसाठी फक्त ४.७ रुपये प्रतिदिन अनेक फायदे मिळतात.

आणखी वाचा : BSNL ने लाँच केले २६९ आणि ७६९ रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन; यावर काय ऑफर आहे लगेच जाणून घ्या

६६६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जीओ ८४ दिवसांच्या वैधतेसह ६६६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करते. हे जीओ मधील सर्वात लोकप्रिय रिचार्जपैकी एक आहे. ते कॉल आणि इंटरनेट दोन्हीसाठी उत्कृष्ट आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर, ग्राहकांना १२६ जीबी डेटा मिळतो म्हणजेच त्यांना दररोज १.५ जीबी इंटरनेट मिळते. याशिवाय अमर्यादित कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि जीओ अॅप्सची मोफत वैधता देखील दिली जाते.

जीओ ८४ दिवसांच्या वैधतेसह ७१९ आणि १ हजार १९९ चे प्रीपेड रिचार्ज देखील ऑफर करत आहे. हे रिचार्ज अशा लोकांसाठी आहेत ज्यांचा डेटा वापर जास्त आहे. जिओच्या ७१९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि १ हजार १९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ३ जीबी डेटा प्रतिदिन दिला जातो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Call fiercely for 84 days in just 5 rupees daily pdb
First published on: 15-10-2022 at 18:10 IST