Elon Musk हे Twitter चे सीईओ आहेत. त्यांनी ट्विटरची खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये सातत्याने काही बदल करण्यात येत आहेत. अजूनही केले जात आहेत. मात्र तुम्हाला काय वाटते की मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून ते आनंदी आहेत का ? त्यांचे म्हणणे ऐकल्यावर असे वाटत आहे की ट्विटरची खरेदी केल्यापासून ते फार कठीण प्रसंगांमधून जात आहेत. मस्क यांनी नुकताच BBC ला एक मुलाखत दिली आहे. तर त्यांनी या मुलाखतीमध्ये ट्विटरवर व अन्य प्रश्नांची कशाप्रकारे उत्तरे दिली आहेत ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलॉन मस्क यांनी बीबीसीला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये एलॉन मस्क यांना यांना विचारण्यात आले त्यांना ट्विटर विकत घेतल्याबद्दल खेद वाटतो का? यावर उत्तर देताना अब्जाधीश मस्क म्हणाले, ट्विटर हे माझ्यासाठी “अत्यंत वेदनादायक” राहिले आहे. ट्विटरचा अनुभव हा माझ्यासाठी आनंददायी नव्हता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी देखील सांगितले, ते कंटाळवाणे नाही परंतु जेव्हापासून त्यांनी लोकप्रिय मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट विकत घेतली तेव्हापासून त्यांना ती रोलरकोस्टर राईडसारखे वाटत आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

हेही वाचा : Twitter वर एलॉन मस्क यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो, युजर्स म्हणाले…

एलॉन मस्क यांनी मुलाखतीमध्ये सांगितले, ट्विटरची खरेदी केल्यापासून त्या येणाऱ्या अडचणींची पातळी खूप जास्त आहे. पण, मस्क यानी त्यांच्या ट्वीटर खरेदी करण्याच्या निर्णयाचे समर्थन देखील केले आहे. ट्विटर खरेही करणे हे योग्य होते असे मस्क यांना वाटत आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप वाटत नाही आहे. तथापि त्यांनी ट्विटर त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे हे मान्य केले आहे.

हेही वाचा : BBC vs Twitter: ट्विटरने बीबीसीवर ‘गव्हर्मेंट फंडेड मिडियाचे लेबल लावताच कंपनीची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्ही एक…”

मस्क ट्विटर विकणार का?

तसेच या मुलाखतीमध्ये बोलताना एलॉन मस्क म्हणाले, ऑफिसमध्ये कामाचा इतका ताण आहे की मी कधी कधी ऑफिसमध्येच झोपतो. झोपण्यासाठी ग्रंथालयातील सोफ्याचा वापर करतो. एलॉन मस्क यांनी असेही स्पष्ट केले की त्यांना वाटते की त्यांनी रात्रीचे ट्विट करणे टाळले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ट्विटर विकत घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना मस्क म्हणाले, जर मला ट्विटरसाठी कोणी योग्य व्यक्ती सापडली तर मी त्या व्यक्तीला ट्विटर विकून टाकेन.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ceo elon musk says owning twitter quite painful sell it to right buyer tmb 01
First published on: 13-04-2023 at 12:05 IST