OpenAI च्या chatgpt या चॅटबॉटची प्रसिद्धी जगभर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वत्र टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये AI चॅटबॉटची चर्चा सुरु आहे. याला प्रत्येकजण टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. पण हा चॅटबॉट नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका असल्याचे अनेकांचे मत आहे. AI Chatbot लोकांच्या नोकऱ्या खाऊन टाकेल असा लोकांचे म्हणणे आहे. त्याच दरम्यान हा नोकऱ्यांमध्ये मदत करेल असेही काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान Infosys चे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी AI आणि ChatGPT च्या भवितव्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.

काय म्हणाले नारायण मूर्ती

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) च्या स्थापनेला ६७ वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती बोलत होते. नारायण मूर्ती म्हणाले, AI हे माणसांची जागा घेणार नाही कारण मानव AI ला तसे करू देणार नाहीत. AI हा माणसांची जागा घेईल हा गैरसमज आहे असे मला वाटते. AI ने असिस्टंट होऊन आपल्या जीवनाला अधिक आरामदायी केले आहे आहे असे नारायण मूर्ती म्हणाले.

हेही वाचा : ChatGPT बाबत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचं मोठं विधान; म्हणाले, “हे जग …”

तसेच ते पुढे म्हणाले की, या टेक्नॉलॉजीमुळे मानवाचे जीवन अधिक आरामदायी झाले आहे. मानवाकडे अशी बुद्धिमत्ता आहे की जिच्याशी कोणताही संगणक स्पर्धा करू शकत नाही असे देखील नारायण मूर्ती म्हणाले. तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजीचा शोध लावता हे महत्वाचे नाही कारण मानवाचे मन हे कायम टेक्नॉलॉजीच्या एक पाऊल पुढे असते आणि त्यामुळेच मानव टेक्नॉलॉजीवर राज्य करतो.

हेही वाचा : ChatGPT ला प्रतिस्पर्धी विकसित केला जाणार; Elon Musk यांनी केली टीमची नियुक्ती, जाणून घ्या

OpenAI ने विकसित केलेले ChatGpt आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard AI लॉन्च केले आहे. Chatgpt हा एक कृत्रिम chatbot आहे. मायक्रोसॉफ्टने chatgpt तर गुगलने Bard विकसित केले आहे. अनेक कंपन्या आपला स्वतःचा chatbot विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Google च्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने भगवद्गीतेवर एक Gita GPT AI चॅटबॉट विकसित केला आहे. गीता चॅटबॉटच्या मदतीने वापरकर्ते आपल्या दैनंदिन समस्यांबाबत गीतेचा सल्ला घेऊ शकणार आहेत. म्हणजेच वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर जे काही प्रश्न विचारतील त्याचे उत्तर AI चॅटबॉट भगवद्गीतेच्या मदतीने देणार आहे. Gita GPT हा सुद्धा एक चॅटजीपीटीसारखा AI Chatbot आहे.