गुगल क्रोम आणि मोझिलामध्ये अनेक धोकादायक बग्स आढळून आले आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना , या दोन्ही वेब ब्राउझरच्या नवीनतम आवृत्त्या डाउनलोड आणि अपडेट करण्याची सूचना दिली आहे. इतकंच नाही तर वापरकर्त्यांना क्रोम ब्राउझरची नवीनतम आवृत्ती गुगलवरून डाउनलोड करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.भारतासह संपूर्ण जगाला इंटरनेटचं वेड लागलं आहे. अशी मोजकीच लोक असतील जी इंटरनेटचा वापर करत नाहीत. मोबाईल असो किंवा लॅपटॉप , इंटरनेट सर्फिंगसाठी गुगल क्रोम आणि मोझिलाचा सर्वाधिक वापर केला जातो. अँड्रॉईड स्मार्टफोन गुगलच्या ओएसवर काम करतात आणि अशा परिस्थितीत या दोन्ही कंपन्यांकडे करोडो लोकांचा डेटा आहे. जर तुम्हीही यापैकी कोणतेही वेब ब्राउझर वापरत असाल तर तुमचा वैयक्तिक डेटा धोक्यात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रोम (Chrome) आणि मोझिला (Mozilla ) वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात

सीईआरटी- इन ने एक चेतावणी जारी केली आहे की जर तुम्ही यापैकी कोणतेही वेब ब्राउझर वापरत असाल तर तुमचा वैयक्तिक डेटा हॅक होऊ शकतो. या दोन्ही वेब ब्राउझरमध्ये काही धोकादायक बग्स आढळले आहेत आणि या बग्सच्या मदतीने हॅकर ग्रुप गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या लोकांचा डेटा ऍक्सेस करू शकतात. सीईआरटी-इन या बग्सना हाई रिस्कवर मार्क केले आहे. म्हणजेच डेटा चोरी आणि हॅकिंगचा धोका उद्भवू शकतो. गुगल क्रोमबाबत असे सांगण्यात आले आहे की , ऑपरेटिंग सिस्टम ९६.०.४६६४.२०९ च्या आधीच्या या वेब ब्राउझरच्या सर्व आवृत्त्या या धोक्याच्या कक्षेत येतात. त्याचप्रमाणे, मोझिला फायरफॉक्स आईओएस १०१ आणि मोज़िला फायरफॉक्स थंडरबर्ड ९१.१० च्या आधीच्या सर्व आवृत्त्या देखील हॅकर्सच्या श्रेणीत येतात. तुम्ही वापरत असलेले क्रोम ब्राउझर किंवा मोझिला फायरफॉक्स या आवृत्त्यांपेक्षा पूर्वीचे असल्यास, तुम्ही ते ताबडतोब नवीनतम आवृत्तीवर अपडेट केले पाहिजे.

‘अशा’ प्रकारे गुगल क्रोम (Google Chrome ) अपडेट

१) सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर गुगल क्रोम ओपन करा.

२) गुगल क्रोमच्या वरच्या उजव्या बाजूला ‘थ्री डॉट्स’ दिसतील , त्यावर क्लिक करा.

३) जर गुगल क्रोमचे अपडेट उपलब्ध असल्यास, तेथे उपस्थित असलेले अपडेट आयकॉन या रंगात दिसेल.

हिरवा – अपडेट रिलीझ होऊन दोन दिवसांपेक्षा कमी वेळ झाला आहे.
ऑरेंज – अपडेट सुमारे चार दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे.
लाल – अपडेट रिलीझ झाल्यापासून एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे.

४) अपडेट आयकॉनवर क्लिक केल्याने तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर गुगल क्रोम अपडेट होणे सुरू होईल.

५) अपडेट केल्यानंतर, Google Chrome रीस्टार्ट करा म्हणजेच ते बंद करा आणि पुन्हा चालू करा.

मोझिला फायरफॉक्स (Mozilla Firefox) कसे अपडेट करावे ?

१) तुमच्या लॅपटॉप किंवा संगणकावर मोझिला फायरफॉक्स उघडा.

२) वेब ब्राउझरमध्ये फायरफॉक्स टूलबारच्या उजव्या बाजूला मेनू बटण दिलेले आहे, त्यावर क्लिक करा.

३) टूलबारमध्ये हेल्प पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

४) हेल्प टॅबखाली तुम्हाला फायरफॉक्सचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

५) फायरफॉक्स आपोआप अपडेट्स होण्यास सुरुवात करेल आणि नवीन अपडेट्स प्राप्त होताच, ब्राउझर अपडेट्स सिस्टममध्ये डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

गुगल क्रोमप्रमाणे, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउझर देखील बंद करणे आणि अपडेट डाउनलोड झाल्यानंतर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. यासाठी, तेथे दिलेल्या रीस्टार्ट टू अपडेट फायरफॉक्स बटणावर क्लिक करा आणि असे केल्याने तुमचा वेब ब्राउझर नवीनतम आवृत्तीमध्ये अपडेट होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chrome and firefox endanger the data of billions of users do these things now to keep your information safe gps
First published on: 10-06-2022 at 12:28 IST