वेब होस्टिंग कंपनी GoDaddy मधला डेटा लीक झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. GoDaddy च्या १.२ दशलक्ष सक्रिय आणि निष्क्रिय वर्डप्रेस वापरकर्त्यांचे ई-मेल आयडी लीक झाले आहेत. या बातमीला GoDaddy ने दुजोरा दिला आहे. १७ नोव्हेंबर २०२१ डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली. मात्र हा डेटा ६ सप्टेंबरपासून लीक होत असल्याचं समोर आलं आहे.

“आम्हाला आमच्या वर्डप्रेस होस्टिंगमध्ये काही संशयास्पद बाबी दिसून आल्या. त्यानंतर एका आयटी फॉरेन्सिक फर्मच्या मदतीने त्वरित तपास सुरू केला. तसेच कायद्येशीर मदतही घेतली जात आहे. त्याचबरोबर थर्ड पार्टी एक्सेससुद्धा ब्लॉक केला आहे.”, GoDaddy ने एका निवेदनात म्हटले आहे. या डेटा लीकमध्ये १.२ दशलक्ष वर्डप्रेस वापरकर्त्यांचे ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक सार्वजनिक झाले आहेत. लीक झालेले फोन नंबर आणि ई-मेल फिशिंग हल्ल्यांमध्ये वापरले जाऊ शकतात. या प्रोसेसमध्ये वर्डप्रेसचा मूळ अ‍ॅडमिन पासवर्डही लीक झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपला पासवर्ड त्वरित बदलणे आवश्यक आहे.

काही ग्राहकांच्या SSL खाजगी की देखील लीक झाल्या आहेत. त्यामुळे कंपनी लवकरच नवीन प्रमाणपत्र जारी करणार आहे. ग्राहक https://www.godaddy.com/help वर जाऊनही मदत मिळवू शकतात, असेही कंपनीने म्हटले आहे.