डब्बा टीव्हीचा काळ गेला! OnePlus, Redmi, LG कडून स्मार्ट टीव्हीवर ६०%पर्यंत डिस्काउंट

जर तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला उत्तम सवलत आणि ऑफर्स हवे असतील तर ही एक उत्तम संधी आहे.

डब्बा टीव्हीचा काळ गेला! OnePlus, Redmi, LG कडून स्मार्ट टीव्हीवर ६०%पर्यंत डिस्काउंट

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता सुरू होतील. या सेलमध्ये तुम्ही Amazon India वरून ६० टक्के पर्यंत डिस्काउंट देऊन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर स्मार्ट टीव्हीही सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान चालेल. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला उत्तम सवलत आणि ऑफर्स हवे असतील तर ही एक उत्तम संधी आहे. आम्ही तुम्हाला OnePlus, LG, Sony, Blopunkt आणि Westinghouse सारख्या ब्रँडच्या टॉप स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत…

OnePlus TV 43 Y1S Pro
वनप्लसचा हा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही 4K रिझोल्यूशन ऑफर करतो. हा टीव्ही Netflix, Prime Video, Zee5, Oxygen Play, Eros Now, JioCinema, SonyLiv, YouTube, Hungama आणि Hotstar सारख्या अॅपला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये 3 HDMI पोर्ट, स्टिरीओ सराउंड स्पीकर, ६० Hz रिफ्रेश रेट आणि २ USB पोर्ट आहेत. टीव्ही ड्युअल-बँड वाय-फाय साउंड आणि २४ W आउटपुट ऑफर करतो.

आणखी वाचा : Reliance Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन! १४९ रुपयांपासून, २८ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर

Redmi Smart TV L43R7-7AIN
रेडमीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये ४३ इंच स्क्रीन आहे जी 4K रिझोल्यूशन देते. या टीव्हीला Netflix, Prime Video, YouTube आणि Disney + Hotstar सारख्या अॅप्समध्ये प्रवेश मिळतो. यात ३ HDMI पोर्ट, स्टिरीओ स्पीकर आणि ६० Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आहे.

रेडमीचा हा स्मार्ट टीव्ही १७८ डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगलसह येतो. यात ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, ३ एचडीएमआय पोर्ट, सेट-टॉप बॉक्स, २ यूएसबी पोर्ट यांसारखी फीचर्स आहेत. याशिवाय रेडमीच्या या टीव्हीला ३० W साउंड आउटपुट, डॉल्बी ऑडिओ, डॉल्बी अॅटमॉस, अँड्रॉइड १०, पॅचवॉल ४, क्वाड-कोर प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते.

आणखी वाचा : Nothing Phone (1) च्या Lite वर्जनबद्दल कार्ल पेई यांनी मोठी माहिती दिली, जाणून घ्या

LG Smart TV 43LM5650PTA
या LG स्मार्ट टीव्हीची स्क्रीन साइज ४३ इंच आहे आणि त्याचे रिझोल्यूशन १०८० पिक्सेल आहे. हा LG TV Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar आणि YouTube सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये २ HDMI पोर्ट, स्टिरीओ सराउंड स्पीकर आहेत. टीव्ही स्क्रीनचा रिफ्रेश रेट ५० Hz आहे. कनेक्टिव्हिटीसाठी २ HDMI पोर्ट, १ USB पोर्ट उपलब्ध आहेत. या टीव्हीमध्ये २० W साउंड आउटपुट आहे.

एलजीचा हा टीव्ही वेबओएस स्मार्ट टीव्ही आहे आणि त्यात अनलिमिटेड ओटीटी अॅप सपोर्ट, एलजी कंटेंट स्टोअर, होम डॅशबोर्ड, मिनी टीव्ही ब्राउझर, क्लाउड फोटो आणि व्हिडिओ, मल्टी-टास्किंग, स्क्रीन मिरर, ऑफिस 365, वाय-फाय डिस्प्ले यांसारखी फीचर्स आहेत.

आणखी वाचा : १५० W फास्ट चार्जिंग आणि १६ GB RAM चा OnePlus 10T फोन, जाणून घ्या टॉप ५ फीचर्स

Westinghouse Smart TV WH50UD82
वेस्टिंगहाउस टीव्ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान ६०% पर्यंत सूट मिळू शकते. वेस्टिंगहाउस UHD 4K टीव्हीच्या स्मार्ट आणि नॉन-स्मार्ट टीव्ही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. कंपनीचे २४ इंच नॉन-स्मार्ट एलईडी टीव्ही आणि ४ स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही – ३२-इंच HD रेडी, ४०-इंच फुलएचडी, ४३-इंच फुलएचडी आणि ५५-इंच अल्ट्राएचडी, याशिवाय नव्याने लॉंच झालेल्या ३२ HD, ४३ UHD आणि ५० इंच UHD मॉडेल्स असतील ई- कॉमर्स साइटवरून SBI बँक क्रेडिट कार्डसह १० टक्के अतिरिक्त सूट मिळण्याची संधी आहे.

वेस्टिंगहाऊसच्या या स्मार्ट टीव्हींना ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट स्क्रीन, १७८ डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल, ३ एचडीएमआय पोर्ट्स, ब्ल्यू रे स्पीकर, २ यूएसबी पोर्ट यांसारखी फीचर्स मिळतात. प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, ZEE5, Sony Liv सारखे अॅप्स या स्मार्ट टीव्हीमध्ये सपोर्ट आहेत. या टीव्हींना ४० W साउंड आउटपुट मिळतो.

आणखी वाचा : Jio च्या प्लॅनमध्ये १०९५ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री ऑफर, किंमत ४१९ रुपयांपासून सुरू

Blaupunkt Smart TV
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये तुम्हाला Blopunkt च्या स्मार्ट टीव्हीवर सूट मिळवण्याची संधी आहे. या सेलमध्ये Blaupunkt Cyber ​​Sound ३२ इंचाचा टीव्ही ११,९९९ रुपयांना घेता येईल. हे HD-रेडी स्क्रीनसह येते आणि ४० W स्पीकर्सला समर्थन देते. याशिवाय जर हिरो मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर ४२ इंचाचा फुलएचडी स्मार्ट टीव्ही १७,९९९ रुपयांमध्ये घेता येईल. हा Android TV १६ GB रॅम, ८ GB स्टोरेज, अल्ट्रा-थिन बेझल्स, ४० W स्पीकर साउंड आउटपुटसह येतो.

४३-इंच स्क्रीनसह Blopunkt Ultra-HD स्मार्ट टीव्ही विक्रीमध्ये २६,९९९ रूपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा टीव्ही Android 10 सह येतो आणि त्यात २ GB रॅम, ८ GB स्टोरेज आणि ५० W स्पीकर आहेत. हा टीव्ही बेझल-लेस डिझाइन ऑफर करतो. यात डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराऊंड प्रमाणित ऑडिओ आणि ४ स्पीकर आहेत.

३१,९९९ रुपयांमध्ये मोठ्या स्क्रीनचा ५०-इंचाचा अल्ट्रा-एचडी टीव्ही मिळण्याची संधी आहे. यात अँड्रॉइड १०, ६० W स्पीकर, २ GB रॅम सारखे फीचर्स आहेत. तसंच बेझल-लेस डिझाइनसह ५५ -इंच अल्ट्रा-एचडी टीव्हीची किंमत ३७,९९९ रुपये आहे आणि डॉल्बी डिजिटल प्लससह ६० W स्पीकर आहेत. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे.

६५ इंच स्क्रीनसह अल्ट्रा-एचडी टीव्हीची किंमत ५४,९९९ रुपये आहे आणि तो Android 10 सह येतो. यात ६० W स्पीकर, DTS TruSurround प्रमाणित ऑडिओ सारखी फीचर्स आहेत. या टीव्हीमध्ये ४ स्पीकर उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discount offers on smart tv oneplus redmi lg westinghouse blaupunkt smart tv prp

Next Story
Reliance Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन! १४९ रुपयांपासून, २८ GB पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर
फोटो गॅलरी