VW 32 inches HD Ready LED TV : डिसेंबर महिन्यात तुम्ही ३२ इंच टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अमेझॉनवर VW (32 inches) HD Ready LED TV VW32A 2021 मॉडेलवर मोठी सूट मिळत आहे. या ३२ इंच टीव्हीवर ४८ टक्क्यांची सूट मिळत आहे. यामुळे जवळपास अर्ध्या किंमतीमध्ये हा टीव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.

अमेझॉनवर या टीव्हीची लिस्टेड किंमत १२ हजार ९९९ रुपये असून त्यावर ४८ टक्के सूट देण्यात आली आहे. यामुळे आता हा टीव्ही तुम्ही केवळ ६ हजार ७९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच या टीव्हीवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. कोटक महिंद्रा बँक डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तुम्ही १२५० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकता.

(अबब.. ४५ हजारांची घड्याळ! अमेझफीटने लाँच केलेल्या ‘या’ घड्याळीत असं काय आहे विशेष? जाणून घ्या)

काय आहेत फीचर्स?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ३२ इंच टीव्हीमध्ये अनेक फीचर्स मिळतात. टीव्हीमध्ये ६७ हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. हा टीव्ही २० वॉटचा साउंड आऊटपूट देतो. या टीव्हीवर १ वर्षांची वॉरंटी मिळत आहे. टीव्हीमध्ये एचडीएमआईसह यूएसबी आणि एवी पोर्ट मिळतो.