व्हाट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉइस कॉल्स, व्हिडीओ क्लास आणि असंख्य गोष्ट आपण यावरून करू शकतो.करोडो भारतीय व्हाट्सअ‍ॅपचा वापर करतात. याच whatsapp च्या मदतीने जम्मू काश्मीरमध्ये एका महिलेची प्रसूती करण्यात आली. हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने झाला मुलाचा जन्म

PTI च्या एका अहवालानुसार , जम्मू काश्मीरमधील एका गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. मात्र ती जम्मू-काश्मीरमधील केरन या भागात अडकली होती. ती तिथे अडकण्याचे कारण म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला होता. तिथे जाऊन उपचार करण्यात डॉक्टरांना अडचण येत होती. मात्र या डॉक्टरांनी मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी एक पर्याय मिळाला. तो पर्याय म्हणजे WhatsApp होय. whatsapp कॉलद्वारे डॉक्टरांनी त्या महिलेची मदत केली.

हेही वाचा : Meta Layoff: ‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, सात हजार कर्मचाऱ्यांना दिले…

क्रॅलपोराचे ब्लॉक वैद्यकीय अधिकारी डॉ. मीर मोहम्मद शफी म्हणाले की, शुक्रवारी रात्री या महिलेला कॅरेन पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे दाखल करण्यात आले. महिलेची परिस्थिती बघता तिला चांगल्या दवाखान्यात नेण्याची गरज आहे हे डॉक्टरांना कळत होते. मात्र हिमवृष्टीमुळे असे करता येणे शक्य नव्हते. जेव्हा कोणताच पर्याय डॉक्टरांसमोर उपलब्ध नव्हता तेव्हा त्यांना महिलेची काळजी घेण्यासाठी टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहावे लागले.

डॉ. परवेझ या स्त्रीरोगतज्ज्ञांनी डॉ. अरशद सोफी आणि त्यांच्या पॅरामेडिकल स्टाफला केरन पीएचसी येथे व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर मुलाला जन्म देण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली. व्हॉट्सअ‍ॅप वापरुन त्यांनी मार्गदर्शन केले आणि शेवटी त्या महिलेनं निरोगी मुलाला यशस्वीरित्या जन्म दिला. सध्या मूल आणि आई दोघेही रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors get help whatsapp for pregnant women snowfall keran jammu and kashmir tmb 01
First published on: 23-02-2023 at 12:35 IST