कमी वापरामुळे, फेसबुक तुमच्या रिअल-टाइम लोकेशनचा मागोवा घेणाऱ्या अनेक सेवा बंद करत आहे. ज्यामध्ये जवळचे मित्र, लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राऊंड लोकेशन समाविष्ट आहे. द व्हर्जच्या वृत्तानुसार, या सेवा वापरणाऱ्या युजर्सना पाठवण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की, फेसबुक ३१ मे रोजी या फीचर्सशी संबंधित डेटा संकलित करणे थांबवेल आणि १ ऑगस्ट रोजी संपूर्ण संग्रहित डेटा नष्ट करेल.

मेटा प्रवक्ते एमिल वाझक्वेझ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही फेसबुकवरील काही स्थान-आधारित वैशिष्ट्ये कमी वापरामुळे काढून टाकत असलो तरीही युजर्सची स्थान माहिती कशी गोळा केली जाते आणि वापरली जाते हे जाणून घेण्यासाठी लोक लोकेशन सर्व्हिसचा वापर करू शकतात.”

छोटे बदल मोठा आर्थिक फायदा; लाइट बील कमी करण्यासाठी ‘या’ खास Tips तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील

अहवालानुसार, याचा अर्थ असा नाही की कंपनी लोकेशन डेटा गोळा करणे पूर्णपणे बंद करेल. वापरकर्त्यांना दिलेल्या नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे, फेसबुकने सांगितले की ते संदर्भित जाहिराती देण्यासाठी आणि त्यांच्या डेटा धोरणाच्या अनुषंगाने इतर अनुभवांसाठी स्थान चेक-इन देण्यासाठी स्थान माहिती गोळा करणे सुरू ठेवेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्स सेटिंग्ज आणि गोपनीयता मेनूमध्ये कोणताही जतन केलेला स्थान डेटा पाहू शकतात, डाउनलोड करू शकतात किंवा हटवू शकतात. अन्यथा, १ ऑगस्ट रोजी फेसबुक त्याच्या बंद केलेल्या सेवांशी संबंधित सर्व संग्रहित डेटा आपोआप हटवेल.