IPL २०२३ सुरु होऊन आता १५ ते २० दिवस झाले आहेत. IPL हे भारतातील लोकांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी असते. क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा कार्निव्हल पुन्हा एकदा परत आला आहे आणि भारतातील जवळजवळ प्रत्येकजण त्यांचा आवडता सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो सण म्हणजे टाटा IPL २०२३ हा आहे.
तीन हंगामांनंतर प्रीमियम लीग त्याच्या मूळ होम आणि अवे फॉरमॅटमध्ये परत आली आहे परंतु यावेळी त्याच्या नवीन डिजिटल भागीदार JioCinema च्या प्रवेशाने टाटा IPL 2023 सीझनचे आकर्षण वाढले आहे. आयपीएलच्या आगामी हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात ३१ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता पार पडला. यावेळी ५२ दिवसांच्या कालावधीत एकूण ७० लीग टप्प्यातील सामने १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत.
टाटा आयपीएलच्या या सीझनच्या सुरुवातीच्या आठवड्यांपासून याचे प्रक्षेपण जिओ सिनेमाच्या माध्यमातून केले जात आहे. पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, JioCinema ने दर्शकांच्या बाबतीत रेकॉर्ड तोडताना पाहिले आहे. टाटा IPL 2023 ला JioCinema वर १४७ कोटी असे रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, आठवड्याच्या अखेरीस येणार्या एकूण दर्शकांची संख्या टाटा IPL साठी गेल्या वर्षी नोंदवलेल्या एकूण संख्येशी आहे. जी ICC T20 विश्वचषक २०२२ पेक्षा जास्त होती. भारतीय क्रिकेट प्रेमी त्यांच्या आवडत्या टीमच्या मॅचेस आणि आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची का निवड करत आहेत असा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर त्यामागे काय कारणं आहेत ते जाणून घेऊयात.
१.
भारतामध्ये पहिल्यांदाच लोकं जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग म्हणजे टाटा IPl २०२३ ४के क्वालिटीमध्ये बघायला मिळत आहे. प्रेक्षक या लीगला Jiocinema App द्वारे आयपीएल मॅचेस ४ के क्वालिटीला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकणार आहेत.
२.
Hype Feature : JioCinema नुकत्याच संपलेल्या SA20 आणि TATA WPL मध्ये या फीचरची क्षमता दाखवली आहे. परंतु टाटा आयपीएलमध्ये आम्ही हे फिचर त्याच्या पूर्ण क्षमतेचे प्रदर्शन करताना पाहू कारण टाटाने सर्वात लोकप्रिय ‘हाइप’ फिचर परत आले आहे. तसेच वापरकर्त्यांना लाईव्ह ऍक्शनच्या समांतर टीम स्कोअरिंग रेट, बॅट्समनचे स्कोअरिंग झोन, बॉलर्सचे हीट मॅप, वॅगन व्हील्स आणि इतर आकडेवारीची तपासणी करण्याची परवानगी देणार आहे.
३.
Multi-camera angle feature: JioCinema वापरकर्त्यांना मल्टी-कॅमेरा अँगलमध्ये टॉगल करण्याचा पर्याय देईल. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा, केबल कॅमेरा, बर्ड्स आय कॅमेरा, स्टंप कॅमेरा आणि बॅटर कॅमेरा अशा अँगलचा समावेश आहे. जर तुम्हाला सूर्यकुमार यादवचे ३६० -डिग्री प्रदर्शन पाहणे आवडत असेल किंवा एमएस धोनीचे हेलिकॉप्टर टेक ऑफ झाल्यावर तुम्ही रोमांचित झाला असाल तर तुम्हाला टाटा आयपील डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिल्याचे समाधान वाटू शकते.
हेही वाचा : Apple चे सीईओ टीम कुक यांनी AI बाबत केले भाष्य; म्हणाले, “आज अनेक…”
४.
तुमचे आवडते आयपीएल लीग पाहताना ती आपल्या आवडीच्या भाषेमध्ये पाहायला मिळाली तर जास्त मजा येते. जिओसिनेमा टाटा आयपीएल इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओरिया यासह १२ भाषांमध्ये आणि इनसाइडर फीड, Hangouts फीड, फॅन्टसी फीड आणि फॅनझोन फीडसह १६ फिडमध्ये टाटा आयपीएल पाहण्याची परवानगी देते. म्हणजेच इतक्या भाषांमध्ये तुम्हाला आयपीएल जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.
५.
जिओसिनेमा सर्वांना टाटा आयपीएल सर्व प्रकारच्या नेटवर्कवर मोफत पाहण्याची ऑफर देते. मग ते Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कोणतेही नेटवर्कचे मेंबर असले तरीदेखील त्यांना टाटा आयपीएल पाहता येणार आहे.