Big Shopping Utsav Details In Marathi : सणासुदीच्या काळात आपल्यातील बरेच जण ड्रेसपासून ते कारपर्यंत नवनवीन वस्तूंची खरेदी करतात, त्यामुळे अनेक कंपन्यादेखील सेलची घोषणा करून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स घेऊन येत असतात. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलनंतर आता फ्लिपकार्ट कंपनीने बिग शॉपिंग उत्सव (Big Shopping Utsav) सेल सुरू केला आहे. या सेलदरम्यान, तुम्हाला नवीन फोन, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, साउंडबार, स्मार्टवॉच, इअरफोन्स यांसारखी स्मार्ट गॅझेट्स अतिशय स्वस्त दरात खरेदी करता येणार आहेत. तसेच हा सेल १३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

जर तुम्ही BOBCARD, ॲक्सिस बँक, आरबीएल बँक, येस बँकचे युजर्स असाल तर तुम्हाला १० टक्के सूट, फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्स असाल तर विशिष्ट खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक; तर फ्लिपकार्ट पे लेटर पेमेंट पर्यायाद्वारे विनाखर्च इएमआय पर्याय, एक लाखांपर्यंतचे क्रेडिट फायदेदेखील मिळवू शकता.

बिग शॉपिंग उत्सव (Big Shopping Utsav) या सेलमध्ये ॲपल, विवो, सॅमसंग, मोटोरोला यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सचे स्मार्टफोनही त्यांच्या नेहमीच्या किमतींच्या तुलनेत कमी दरात दिले जात आहेत. तसेच सॅमसंग गॅलॅक्सी एस २३, गॅलॅक्सी एस २४ प्लस, आयफोन १५, आयफोन १५ प्रो, नथिंग फोन २ ए, गूगल पिक्सेल ८ आणि मोटोरोला जी ८५ ५जी वर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे.

हेही वाचा…Samsung च्या ‘या’ दोन फोल्डेबल स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर; नो कॉस्‍ट ईएमआय, अपग्रेड बोनस, कॅशबॅकचाही मिळेल आनंद

इतर उत्पादनांवर ऑफर :

बरं, बिग शॉपिंग उत्सव (Big Shopping Utsav) या सेलमध्ये तुम्हाला इतर उत्पादनांवर ऑफरदेखील मिळू शकते. यामध्ये नथिंगच्या सबब्रँड सीएमएफचा फोन १ (CMF Phone 1) तुम्ही ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेजसह कमीत कमी १२,४९९ रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही ओप्पो ओप्पो के १२ एक्स ५ जी सर्वात कमी किमतीत म्हणजेच ११,८४४ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर जर तुम्ही इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग उत्सव २०२४ मध्ये कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला वॉशिंग मशीन, टेलिव्हिजन सेट, मायक्रो ओव्हनवर ८० टक्के सवलतदेखील मिळू शकते.