Get money back within 48 hours through UPI | Loksatta

UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले तर, ‘या’ पद्धतीने ४८ तासांच्या आत मिळवा परतावा!

आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असून यामुळे पैसे चुकून चुकीच्या खात्यात हस्तांतरित झाल्यास, ४८ तासांच्या आत परत मिळवू शकता.

UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले तर, ‘या’ पद्धतीने ४८ तासांच्या आत मिळवा परतावा!
(संग्रहित छायाचित्र)

आजकाल ऑनलाइन व्यवहारांमध्ये यूपीआयद्वारे बरेच व्यवहार केले जात आहेत. ऑनलाइन पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी यूपीआय हे सर्वात सोपे आणि लोकप्रिय माध्यम आहे. एखाद्यावेळी चुकून वेगळ्याच खात्यावर पैसे पाठवले जाते. परंतु या चुकीनंतर घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असून यामुळे पैसे चुकून चुकीच्या खात्यात हस्तांतरित झाल्यास, ४८ तासांच्या आत परत मिळवू शकता.

आरबीआयने सांगितले ‘हे’ नवीन मार्गदर्शक तत्त्वे

  • यूपीआय मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला मिळणारा मेसेज सेव्ह करा. जर मेसेज डिलीट झाला तर पैसे रिफंड करण्यात खूप अडचणी येतील. व्यवहार पुष्टीकरण संदेशामध्ये PBBL क्रमांक असतो.
  • पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.
  • या प्रक्रियेनंतर, तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील लिहावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, नाव, ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Earn Money Online: एक रुपयाही न गुंतवता घरी बसून कमवता येतील हजारो रुपये; जाणून घ्या काय आहे मार्ग

संबंधित बातम्या

७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट
ओप्पोचा स्वस्त 5G फोन झाला लाँच; ८ तास गेमिंग, ५० एमपी कॅमेरासह मिळत आहेत भन्नाट फीचर्स
Samsung Galaxy A53 आणि OnePlus Nord 2 पैकी कोणता चांगला असेल बजेट स्मार्टफोन? जाणून घ्या
UPI व्यवहारादरम्यान ट्रान्झॅक्शन फेल झालं? कसं कराल निराकरण? जाणून घ्या
तुमच्या फोनमधून हे १७ धोकादायक Apps ताबडतोब डिलीट करा, पूर्ण यादी पाहा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा
आरोग्य वार्ता : ‘फ्लू’ची लस हृदयरुग्णांसाठी लाभदायी
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात