scorecardresearch

Google ने आणले एक नवीन अपडेट, Android युजर्सना १५ मिनिटांत हिस्ट्री डिलीट करता येणार

गुगलने अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. युजर्स शेवटच्या १५ मिनिटांची हिस्ट्री एका झटक्यात डिलीट करता येणार आहे.

Google ने आणले एक नवीन अपडेट, Android युजर्सना १५ मिनिटांत हिस्ट्री डिलीट करता येणार
(फोटो सोर्स : AP)

Google Delete History Feature: गुगलने अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. युजर्स शेवटच्या १५ मिनिटांची हिस्ट्री एका झटक्यात डिलीट करता येणार आहे. Google ने Google I/O 2021 कॉन्फरन्समध्ये या फीचरची घोषणा केली होती आणि ते जुलै २०२१ मध्ये iOS युजर्ससाठी अपडेट करण्यात आले होते. पण अँड्रॉइड यूजर्ससाठी गुगलने आता हे फीचर जारी केले आहे. Android युजर्स हे फिचर कसे वापरू शकतात ते जाणून घ्या.

हे फिचर प्रथम XDA डेव्हलपर्सच्या मिशाल रहमानने पाहिले होते. ज्यांनी दावा केला होता की त्यांना या अपडेटबद्दल आधी एक टीप मिळाली होती आणि आता Google ते रोल आउट करत आहे. यूजर्स त्यांच्या अँड्रॉईड फोनमध्ये हे फीचर तपासू शकतात. यासाठी अँड्रॉईड फोनचे गुगल अॅप ओपन करा आणि नंतर प्रोफाइल पिक्चरच्या आयकॉनवर टॅप करा. यानंतर सेटिंगमध्ये जा जिथे तुम्हाला Delete Last 15 Minutes फीचर मिळेल.

कसे दिसेल डिलीट हिस्ट्री फीचर – अँड्रॉईड फोनच्या गुगल अॅपमध्ये ‘Delete Last 15 Minutes’ फीचर दिसेल. जर ही ओळ तुमच्यासाठी तिथे आली नसेल तर तुम्हाला तुमचे Google अॅप अपडेट करावे लागेल. यानंतरही ते लाइव्ह होत नसेल तर तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. कारण हे फीचर सर्व अँड्रॉईड युजर्सना OTA च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आणखी वाचा : Poco X4 Pro 5G स्मार्टफोन लॉन्चिंग डेट जाहीर, जाणून घ्या फिचर्स

Delete Last 15 Minutes फीचर- Google ने 15 मिनिटांची हिस्ट्री हटविण्यासाठी हे फिचर दिले आहे. हे फिचर क्रोमवर दिसणार नाही, परंतु केवळ Google अॅपमध्ये दिसेल. यासाठी तुम्हाला अॅपच्या वर असलेल्या तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Delete Last 15 Minutes चा पर्याय मिळेल.

या फीचरशिवाय गुगल सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही देतो. याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 महिने, 18 महिने किंवा 36 महिन्यांचा सर्च हिस्ट्री हटवू शकता. यासाठी तुमच्या खात्यावर जाऊन वेब आणि अॅप अॅक्टिव्हिटीमध्ये जाऊन हिस्ट्री ऑटोमॅटिक डिलीटवरही सेट करता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2022 at 23:10 IST

संबंधित बातम्या