GOOGLE PIXEL FOLD : अलीकडे फोल्डेबल फोनबाबत इंटरनेटवर भरपूर चर्चा सुरू आहे. अ‍ॅपलच्या उपकरणांमध्ये फोल्डेबल तंत्रज्ञान नाही यावरून सॅमसंगकडून त्यास मॉक करण्यात आले. नंतर असूसने एक पाऊल पुढे जात थेट फोल्डेबल लॅपटॉपच बाजारात उतरवला. अक्षरश: आकर्षक दिसणाऱ्या या लॅपटॉपने अनेकांचे मन खेचले आणि त्यामुळे हे फोल्डेबल तंत्रज्ञान आता इतर कंपन्याही आपल्या उपकरणांमध्ये वापरत आहे. विवोकडे आधीच हे तंत्रज्ञान आहे, आता गुगल देखील पिक्सेल सिरीजमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

गिकबेंच डेटाबेसवर ऑक्टा कोअर सीपीयू आणि १२ जीबी रॅमसह गुगल फेलिक्स आढळला आहे. अलीकडील काही अफवांनुसार, हा फोन छोटी स्क्रीन, फोल्डेबल तंत्रज्ञान असलेला गुगल पिक्सेल फोल्ड असू शकतो. हा Google Pixel Fold म्हणून ओळखले जाईल, असा अंदाज आहे. फोनच्या वैशिष्ट्यांबाबत कंपनीने मौन बाळगले आहे. फोन २०२३ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

(INFINIX HOT 20 5G स्मार्टफोनची चाचणी, JIO TRUE 5G नेटवर्कवर दिली जबरदस्त स्पीड, खरेदी करण्यापूर्वी निकाल पाहाच)

फोनमध्ये २.८५ गिगाहर्ट्झ ऑक्टाकोअर सीपीयू आणि १२ जीबी रॅम मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर, फोनला अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिम मिळू शकते. पिक्सेल फोल्डबाबत अलीकडील काही अफवांनुसार, फोनची बॉडी अत्यंत जड मेटल आणि ग्लासची असेल. या स्मार्टफोनला बेझलसह मोठा इंटरनल डिस्प्ले मिळू शकतो. आतील डिस्प्लेमध्ये होल पंच स्लॉट किंवा अंडर डिस्प्ले कॅमेरा दिसून येत नाही. फोनला सर्वात वर उजव्या कोपऱ्यात सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

मध्यभागी असलेला होल पंच स्लॉट कवर डिस्प्लेवर असल्याचे समजते. अहवालांनुसार, दोन्ही फ्रंट फेसिंग कॅमऱ्यांना ९.५ मेगापिक्सेल सेन्सर असतील. फोनच्या मागील भागांत तीन कॅमेरा असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन चॉल्क (पांढरे) आणि ऑब्सिडिअन (ब्लॅक) या रंगपर्यांयांसह १ लाख ५० हजार रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतो.