आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आयटी कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. गुगलसारखी मोठी कंपनीने देखील नुकतेच १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. आयटी कंपन्यांच्या या पवित्र्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का पोहोचला. काहींना तर कामावरुन काढले याचे कारणही समजू शकले नाही. अनेकांना कंपनीच्या वेबसाईटवर लॉगइन करताना समजले की, त्यांना काढून टाकण्यात आले आहे. अहो, कर्मचारीच नाही तर चक्क एचआर देखील आपली नोकरी गमवावी लागली आहे. गुगलचे एचआर संभाव्य उमेदवाराशी नोकरीबाबत फोनवर बोलत असताना मध्येच फोन डिसकनेक्ट झाला आणि तेव्हा एचआरला समजलं की त्याचीच नोकरी गेली आहे. Google layoffs चा असाही फटका कर्मचाऱ्यांसोबतच एचआरला बसला आहे.

हे वाचा >> विश्लेषण: गूगल १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार; कर्मचाऱ्यांना किती भरपाई देणार?

pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
young woman was sexually assaulted
नागपूर : ऑटोचालकाशी सलगी तरुणीला भोवली अन् नको ते घडले
farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…

गुगलचे रिक्रूटर म्हणून काम पाहणारे डॅन लॅनिगन-रायन यांनी बिझनेस इनसाइडरशी बोलताना सांगितले की, मी संभाव्य उमेदवाराची फोनवर मुलाखत होतो. तेव्हा फोन मध्येच डिसकनेक्ट झाला. तसेच फोनवर बोलत असताना त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे अकाऊंट बंद करण्यात आल्याचे दाखविले. फक्त रायनच नाही तर त्यांच्या टीममधील अनेक सहकाऱ्यांना अशाचप्रकारे अचानक काढून टाकण्यात आलं आहे. मॅनेजरशी यासंबंधी बोलल्यानंतर त्यांनी तांत्रिक कारण पुढे करत नोकरी गेल्याचे ईमेलद्वारे कळविण्यात येईल, असे सांगितले.

गुगलमध्ये काम करणे माझे स्वप्न होते

रायन यांनी पुढे सांगितले की, मी कंपनीच्या वेबसाईटवर गेलो असताना माझे अकाऊंट आणि ईमेल ब्लॉक असल्याचे दाखविले. तसेच मी उमेदवाराशी फोनवर बोलत असताना माझा फोनही बंद करण्यात आला. तेव्हाच मला कळून चुकलं की माझा गुगलसोबतचा प्रवास इथेच थांबलेला आहे. कंपनीतील सर्वच गोष्टींचा आमचा संपर्क ब्लॉक करण्यात आला होता. त्यानंतर मला समजले की १२ हजार कर्मचारी कपातीमध्ये माझाही नंबर लागलेला आहे. रायन यांनी लिंक्डिन या सोशल मीडिया साईटवर एक दिर्घ पोस्ट लिहून आपली भावना मांडली आहे. “गुगलमध्ये काम करणे हे माझे स्वप्न होते. मी मागच्यावर्षी सहज फिरत असताना माझ्या ईमेलवर गुगलचे ऑफर लेटर आले होते, माझा गगनात मावत नव्हता. पण वर्षभराच्या आतच माझे स्वप्न भंग पावेल, असी कधी वाटले नव्हते.”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया रायन यांनी दिली.

सुंदर पिचाई यांनी घेतली जबाबदारी

एका वर्षापूर्वीच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गूगल खर्च कमी करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. गूगलने ऑक्टोबर २०२२ मध्ये आर्थिक कमाई कमी झाल्याचे सुद्धा सांगितले आहे. गूगलचा नफा हा कमी होऊन १३.९ बिलियन डॉलरपर्यंत आला होता. हीच आकडेवारी पाहता १२ हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय गूगलतर्फे घेण्यात आला होता. कामावरुन कमी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे तसेच काही रक्कम (सेव्हरन्स पे) म्हणून देण्याचे वचन सुंदर पिचाई यांनी दिले आहे.