Google Photos मध्ये नव्या एडिटिंग टूलची भर; स्काय ते पोर्टेट मोडपर्यंतचे पर्याय

गुगल फोटोज वापर करण्याऱ्यांसाठी खूशखबर आहे. गुगल फोटोज नव्या एडिटिंगची टूलचा समावेश केला आहे.

Google_Photos
Google Photos मध्ये नव्या एडिटिंग टूलची भर; स्काय ते पोर्टेट मोडपर्यंतचे पर्याय (Photo- Indian Express)

तंत्रज्ञान म्हटलं रोज नवे अपडेट आणि नविन्याचा शोध घेणारं क्षेत्र आहे. आता गुगल फोटोज वापर करण्याऱ्यांसाठी खूशखबर आहे. गुगल फोटोज नव्या एडिटिंगची टूलचा समावेश केला आहे. गुगले पोट्रेट लाइट, ब्लर आणि स्मार्ट सजेशनसारखे एडिटिंग टूल iOS युजर्ससाठी सुरु केले आहेत. मात्र यासाठी गुगल वन सब्सक्रिफ्शन घ्यावं लागणार आहे. या नव्या फिचर्समुळे फोटो एडिटिंगसाठी मदत होणार आहे. या नव्या टूलसाठी युजर्संच्या डिवाइसमध्ये कमीत कमी 3जीबी रॅम आणि iOS 14.0 च्या वरचं वर्जन असणं गरजेचं आहे.

  • Sky: स्काय फिचर्समुळे युजर्स इमेज एडिट करू शकणार आहेत. यामुळे युजर्स चांगला फोटो तयार करू शकतील.
  • Potrait Light: या फिचर्समुळे युजर्स आर्टिफिशियल लाइटनिंग इफेक्ट देऊ शकतात. त्यामुळे फोटो अधिक आकर्षक करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर फोटो ब्राइट करण्यास मदत होणार आहे.
  • Blur: या फिचर्समुळे युजर्स नवं बॅकग्राउंड अ‍ॅड करू शकतो. यात बॅकग्राउंड ब्लर होतं आणि जो आपण पोर्टेट मोडमध्ये शूट केला आहे.
  • Colour Focus: या टूलच्यामदतीचने युजर्स बॅकग्राउंड डिसॅच्युरेट करण्याबरोबच फोरग्राउंड कलरफुल करू शकतात. यामुळे फोटोतील आणखी आकर्षकपणे पुढे येतो. मुख्य केंद्रावर फोकस करता येतो.
  • Smart Suggestion: स्मार्ट सजेशनमध्ये स्क्रिनवर काही पर्याय दिसतील. त्यावर क्लिक केल्यास फोटोत बदल दिसतील. फोटो जसा चांगला वाटेल तसा करता येईल.
  • HDR: एचडीआर मोडमध्ये युजर्स एक्स्ट्रा लेअर चढवू शकतो. यामुळे फोटोला ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट वाढवू शकतो. यामुळे फोटो अधिक चांगल्या पद्धतीने एडिट करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Google photos new editing tool rmt

Next Story
Redmi Smart Brand Pro लवकरच भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या ‘खासियत’Redmi-Smart-Band-main
ताज्या बातम्या