गुगलची बहुप्रतिक्षित Pixel 7 सीरिज ६ ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात आली असून गुगलचे नवीन फ्लॅगशिप पिक्सेल फोन तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात आले आहेत. आज १३ ऑक्टोबरपासून Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro भारतात पहिल्यांदाच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झाले. महत्त्वाचे म्हणजे, विक्रीच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठेत Pixel 7 मालिकेला ग्राहकांची चांगलीच मागणी असून विक्रीच्या काही तासांतच, Pixel 7 आणि Pixel 7 Pro दोन्ही मॉडेल्सचा स्टॉक संपला आहे. भारतातील Pixel 7 मालिकेचा स्टॉक परत कधी येणार, यावर गुगलने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

Google Pixel 7 फिचर्स

Google ने Pixel 7 मध्ये नवीन Tensor G2 चिपसेट दिला आहे. गुगलचा हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅमसह १२८ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय आहे. Google Pixel 7 मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्राइमरी आणि १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. Pixel 7 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १०.८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. गुगलच्या या स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ४३३५mAh बॅटरी देण्यात आली आहे जी ३०W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

आणखी वाचा : अरे वा! Pixel 6a, Pixel 7 स्मार्टफोन्सना देशात लवकरच मिळणार 5G अपडेट

किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Pixel 7 मालिका भारतात ५९,९९९ रुपयांपासून उपलब्ध झाली आहे. Pixel 7 Pro ज्याच्या मागील बाजूस तिहेरी कॅमेरे आहेत, त्याची किंमत ८४,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट Pixel 7 वर ६,००० कॅशबॅक आणि Pixel 7 Pro वर ८,५०० कॅशबॅक ऑफर करत आहे.