scorecardresearch

WhatsApp वर फेक न्यूज कशी ओळखायची, जाणून घ्या

कोविडच्या काळात व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्या पाठवण्यात आल्या होत्या आणि तरीही आजच्या काळात तात्कालीन घडामोडींची दिशाभूल करणारे संदेश प्रसारित केले जात आहेत. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला फेक न्यूज कशी ओळखता येईल याबद्दल माहिती देणार आहोत.

Whatsapp-Account-Ban-1-1
(फाइल फोटो)

Whatsapp हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. ज्याचा वापर युजर्स एकमेकांशी चॅट करण्यासाठी आणि वैयक्तिक माहिती शेअर करण्यासाठी करतात. मात्र, आजकाल व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज आणि चुकीची माहितीही वेगाने पसरवली जात आहे. पण, मेसेजिंग अॅपवरून खोट्या बातम्या पसरविण्याबाबत अलर्ट केले जातात.

कोविडच्या काळात व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्या पाठवण्यात आल्या होत्या आणि तरीही आजच्या काळात तात्कालीन घडामोडींची दिशाभूल करणारे संदेश प्रसारित केले जात आहेत. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला फेक न्यूज कशी ओळखता येईल याबद्दल माहिती देणार आहोत.

भारतातील किमान १० तथ्य तपासणी संस्थांकडे WhatsApp वर टिपलाइन उपलब्ध आहेत, जेणेकरून युजर्स कोणतीही दिशाभूल करणारे संदेश सहजपणे तपासू शकतील. इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN) द्वारे या टिपलाइन पडताळून घेतल्या जातात. फोटो, व्हिडीओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंगसह संभाव्य दिशाभूल करणारे संदेश पडताळण्यासाठी वापरली जाऊ शकतात. ही तपासणी इंग्रजी, बंगाली, हिंदी, मराठी आणि पंजाबीसह ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

या टिपलाइन्सच्या मदतीने तुम्ही फेक न्यूज ओळखू शकता

एएफपी: +९१ ९५९९९ ७३९८४
बूम: +91 77009-06111 / +91 77009-06588
फॅक्ट क्रिसेंडो: +91 90490 53770
फॅक्टली: +91 92470 52470
इंडिया टुडे: +91 7370-007000
न्यूजचेकर: +91 99994 99044
न्यूजमोबाइल: +९१ ११ ७१२७ ९७९९
Quint WebQoof: +91 96436 51818
द हेल्दी इंडियन प्रोजेक्ट: +91 85078 85079
विश्वास न्यूज: +91 92052 70923 / +91 95992 99372

आणखी वाचा : Google Map चं हे फीचर ट्रेनचं लाइव्ह लोकेशन सांगेल, जाणून घ्या कसा करायचा वापर

याशिवाय, IFCN कडे WhatsApp चॅटबॉट आहे, ज्याची मदत केली जाऊ शकते. जगभरातील ७० हून अधिक देशांतील संदेश आणि माहिती तपासू शकते, असा दावा केला जात आहे.

तथ्य तपासणी टिप्स कशा वापरायच्या?
तुम्हाला हे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावे लागतील. यानंतर तुम्ही त्यांना मेसेज करून तपासात असलेल्या माहितीची माहिती देऊ शकता. कृपया लक्षात घ्या की चाचणीसाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

फॅक्ट चेक तपासण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
WhatsApp वर फॅक्ट चेकसाठी टिपलाईन युजर्सकडून फोटो आणि व्हिडीओ तसेच व्हॉइस आणि टेक्स्ट मेसेजच्या रूपात मिळालेली संभाव्य दिशाभूल करणारी माहिती मागवतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to identify fake news on whatsapp know how prp

ताज्या बातम्या