scorecardresearch

Premium

एकाचवेळी WhatsApp Account चार डिव्हाइसवर कसे लिंक करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

whatsapp ची मूळ कंपनी असणाऱ्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरबद्दल फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे.

how to unable whatsapp account at fopur device
व्हॉट्सअ‍ॅप आता एकाच वेळी चार डिव्हाइसवर वापरता येणार (Image Credit- indian express)

WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. आता व्हॉट्सअ‍ॅप अपडेटबद्दल मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी याबद्दल फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना हे प्लॅटफॉर्म सहज वापरता यावे म्हणून नवनवीन अपडेट सादर करत असते. आताही व्हाट्सअ‍ॅप एक नवीन अपडेट घेऊन आले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअ‍ॅप वापरणे आणखीन सोपे होणार आहे.

whatsapp ची मूळ कंपनी असणाऱ्या मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरबद्दल फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. वापरकर्त्यांना या फीचरच्या मदतीने आपले whatsapp अकाउंट हे एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार आहे. म्हणजे एकाच वेळी चार डिव्हाइसमध्ये तुम्हाला लॉग इन करता येणार आहे.

Honor 90 to be available discounted price on amazon great indian festival sale
Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच
Weight loss eating habits Why meal timing needs to be matched with what you eat
नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?
5 new flagship smartphones
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? २०० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ‘हे’ आहेत बेस्ट फोन्स, जाणून घ्या
Charging iPhone 15
iPhone 15 सीरिज Android स्मार्टफोनच्या चार्जरने चार्ज करु शकता का? जाणून घ्या त्याबद्दल ‘या’ आवश्यक गोष्टी

हेही वाचा: WhatsApp Features 2023: “आजपासून तुम्ही जास्तीत जास्त…” ; मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा

नवीन फीचरमुळे जास्तीत जास्त चार डिव्हाइसवर तुमचे अकाउंट वापरता येऊ शकते. ज्यामध्ये स्मार्टफोन, पीसी आणि टॅबलेटचा समावेश आहे. तुमच्या whatsapp अकाउंटमध्ये चार वेगवेगळे डिव्हाईस अँड्रॉइड किंवा आयफोन कसे कनेक्ट करू शकता. त्याच्या सोप्या स्टेप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

१. तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असल्यास तुम्ही गुगल प्ले स्टारवरून whatsapp ची नवीन सिरीज डाउनलोड करून घ्या. तसेच जर का तुम्ही आयफोन वापरकरते असाल तर Apple स्टोअरवर जाऊन whatsapp डाउनलोड किंवा अपडेट करू शकता.

२. whatsapp अपडेट किंवा डाउनलोड केल्यानंतर इतर डिव्हाइसवर whatsapp ओपन करावे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा कंट्री कोड व फोन नंबर
टाकणायचा पर्याय दिसेल.

३. तो पर्याय दिसला की वरील बाजूस उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट्स दिसतील तिथे क्लिक करा. त्यानंतर ‘लिंक न्यू डिव्हाईस’ वर क्लिक करा.

हेही वाचा: Vivo X90 Series: विवोने लॉन्च केले ‘हे’ दोन जबरदस्त स्मार्टफोन; ५० MP कॅमेरासह मिळणार…

४. आता, तुम्हाला मध्यभागी WhatsApp च्या लोगोसह एक मोठा बारकोड दिसेल.

५. त्यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट जिथे सुरु आहे त्या प्रायमरी अकाउंटवर जा. वरील उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून नंतर लिंक केलेलं डिव्हाइसेस सिलेक्ट करा.

६. तसेच वरीलप्रमाणे करून झाले की नवीन डिव्हाईस लिंक करा आणि दुसऱ्या डिव्हाइसवरील बारकोड सिलेक्ट करा.

या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचे whatsapp अकाउंट इतर चार डिव्हाइसवर Acess करू शकता. इंटरनेट स्पीड आणि तुमच्या whatsapp किती कन्टेन्ट आहे यावर अकाउंट सुरु किंवा लोड होण्यास काही मिनिटांचा अवधी लागू शकतो.

हेही वाचा: आता तुमचे Chats होणार अधिक सुरक्षित; OpenAI ने रोलआऊट केला ‘हा’ पर्याय, जाणून घ्या

जर का तुम्हाला तुमचे अकाउंट एखाद्या डिव्हाइसवरून बंद करायचे असेल तर तुम्ही तुमच्या प्रायमरी फोन सुरु करणे आवश्यक आहे तिथे जाऊन whatsapp ओपन करावे. लिंक डिव्हाईस मेनूवर क्लिक करावे आणि लॉगआऊट पर्यायावर कॅलसिक करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to link and enable whatsapp account with four android and iphone users tmb 01

First published on: 27-04-2023 at 09:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×