रिझ्यूम, महत्वाची माहिती, कागदपत्रे पाठवण्यासाठी ईमेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र अनेकद चुकीच्या ईमेल आयडीवर ईमेल गेल्याच्या घटना घडतात. ईमेल अ‍ॅड्रेस टाकताना गडबड झाल्यास असे होते. मात्र चिंता करण्याची गरज नाही. पाठवलेला ईमेल परत मिळवून देण्याचा पर्याय जीमेलमध्ये उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंडू फंक्शनचा वापर करून तुम्ही पाठवलेला ईमेल रद्द करू शकता. मात्र यासाठी केवळ ३० सेकंदांचा वेळ मिळतो. तुम्हाला ईमेलमध्ये काही बदल करायचे असल्यास हे फीचर फायदेशीर ठरते. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही पाठवलेला ईमेल परत मिळवू शकता.

(फ्लिपकार्टवर शॉपिंग करता? आता कॅश ऑन डिलिव्हरीसाठी द्यावे लागेल अतिरिक्त शुल्क)

  • ईमेल पाठवल्यानंतर लगेच अंडू आणि मेसेज सेंट असे दोन पर्याय येतात. इमेल परत मिळवण्यासाठी तुम्ही अंडू बटनवर क्लिक करा.
  • अंडू बटनवर क्लिक केल्यानंतर पाठवलेला ईमेल तुम्हाला परत कंपोज मोडमध्ये दिसेल.
  • ईमेल ड्राफ्टमध्ये देखील जमा होतो. येथून हा ईमेल उघडून तुम्ही तो एडिट करू शकता किंवा योग्य ईमेल आयडीवर पाठवू शकता.

वेळ मर्यादा बदलण्यासाठी हे करा

  • संगणकावर जीमेल उघडा.
  • वरच्या भागात उजवीकडे सेटिंग्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सी ऑल सेटिंग्सवर क्लिक करा.
  • अंडू सेंडच्या बाजूला सेंड कॅन्सलेशन पीरियडमध्ये ५, १०, २० किंवा ३० सेकंद हे पर्याय निडवू शकता.
  • पर्याय निवडल्यानंतर सर्वात खाली क्लिक सेव चेंजेसवर क्लिक करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to recall email with simple steps in gmail ssb
First published on: 01-11-2022 at 12:18 IST