Fake Medicines Can Be Spotted Through QR: तुमची औषधं सुरक्षित आहेत का? तुमच्या औषधांमध्ये भेसळ तर होत नाही ना? औषधांचा सतत साईड इफेक्ट् जाणवतोय का? या सर्व प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी लवकरच एक नवे कोरे तंत्रज्ञान लाँच केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या या नव्या प्रकल्पाच्या मदतीने भेसळयुक्त औषधे आता आपण त्यांच्यावरील QR (क्युआर) कोड स्कॅन ओळखू शकता.निकृष्ट दर्जाच्या आणि बनावट उत्पादनांचा वापर रोखण्यासाठी सरकार लवकरच टॉप औषध निर्मात्यांसाठी ‘ट्रॅक अँड ट्रेस’ यंत्रणा सुरू करणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सुमारे ३०० टॉप औषध निर्मात्यांना प्राथमिक पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा (क्यूआर) कोड लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. १०० रुपयांपेक्षा अधिक दरात विकल्या जाणार्‍या औषधांवर हे क्यूआर कोड असणे आवश्यक असणार आहे.

ट्रॅक आणि ट्रेस कसे काम करणार?

ट्रॅक आणि ट्रेस ही प्रस्तावित यंत्रणा वापरून ग्राहकांना QR कोड स्कॅन करता येतील त्यानंतर आपण संबंधित औषदाची सरकारी संकेतस्थळावर जाऊन वैधता तपासून पाहू शकाल. आपल्याला औषधाचे योग्य व जेनेरिक नाव, ब्रँडचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख आणि उत्पादन परवाना क्रमांक अशी सर्व माहिती इथे दाखवली जाईल.

Sleeping Position: आयुर्वेद सांगत आहे झोपेची योग्य दिशा; वाईट स्वप्न, सतत जाग येणाऱ्यांनी नक्की पाहाच

आपल्याला सरकारी पोर्टलवर युनिक आयडी कोड फीड करू शकतील आणि मोबाईल त्याचा मागोवा घेता येईल. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक विकल्या जाणार्या ३०० हुन अधिक औषधांचा या यादीत समावेश असेल या औषधांच्या पॅकेजिंगवर बारकोड छापले जाणार आहेत. या प्रणालीमुळे खर्चात ३-४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, केंद्र सरकार सध्या केंद्रीय डेटाबेस एजन्सी स्थापन करण्यावर काम करत आहे जिथे ग्राहकांना औषधांची संपूर्ण माहिती एकाच बार कोडवर मिळवता येईल.

Diabetes Control: शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सुमारे १० टक्के वैद्यकीय उत्पादने निकृष्ट व भेसळयुक्त आढळून आली होती. याबाबत आवश्यक कारवाई करण्यासाठी ही नवी प्रणाली फायदेशीर ठरेल असेही सांगण्यात आले आहे.