गुगल क्रोममधील या अतिरिक्त 8 सुविधा वापरा आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवा | if you want to increase your productivity follow these 8 google chrome extensions technology latest news update nss 91 | Loksatta

गुगल क्रोममधील या अतिरिक्त 8 सुविधा वापरा आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवा

प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वापरा या 8 गुगल ट्रिक्स, वाचा सविस्तर बातमी

Google Chrome Extensions

Google Chrome Extensions : इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानकोपऱ्यातील अनेक गोष्टी शोधणं आता युजर्ससाठी सोपं झालं आहे. कारण गुगल क्रोमसारख्या महत्वाच्या ब्राउजरमध्ये दिवसेंदिवस नवनवीन सुविधांची भर पडत आहे. २००८ मध्ये सुरु झालेला गुगल क्रोमचा वापर जगभरात सर्वात जास्त केला जात आहे. पण या गुगल क्रोममध्ये आता नवीन ८ सुविधा सुरु करण्यात आल्याने प्रॉडक्टिव्हिटीमध्ये जबरदस्त वाढ होणार आहे. हजारोंच्या संख्येत क्रोम एक्सटेन्शन आहेत. पण यातील काहींचा वापर प्रॉडक्टिव्हिटीमध्ये वाढ करण्यासाठी होतो. जाणून घेऊयात गुगल क्रोममधील या खास सुविधांबद्ल सविस्तर माहिती

चेकर प्लस (Checker Plus)
गुगल क्रोमच्या या फिचरचा उपयोग इंटरनेट ब्राउजिंग करत असताना कॅलेंडरप्रमाणे होतो. कामाचा अतिरिक्त भार असल्यास ऑनलाईनच्या कामांमध्ये या सुविधेचा वापर केला जातो. चेकर्स प्लस आगामी होणाऱ्या इव्हेंट्सबद्दल माहिती सांगतं. तसंच मिटिंग नोटिफिकेशन्स आणि रिमाईंडर्ससाठीही याचा उपयोग होतो. गुगल कॅलेंडर पेज न उघडता इव्हेंट्सबद्दल रिमाईंडर देतो. नियमीत कॅलेंडर एक्सटेन्शनपेक्षा १०० पटीने चेकर प्लस अधिक मजबूत आहे.

लास्टपास (LastPass)

लास्टपास हे एक पासवर्ड मॅनेजर असून यामध्ये पासवर्ड सेव्ह केले जातात. तसंच मोबाईल आणि संगणकाच्या डिवाईसमध्ये सर्व पासवर्डला सुरक्षित अॅक्सेस मिळतं. युजर पासवर्ड आणि लॉन इनच्या माहितीसोबतच क्रेडिट कार्डची माहितीही यामध्ये सुरक्षितपणे ठेवू शकतात. लास्टपास वीक आणि वापरलेल्या पासवर्डबद्दल नेहमी सतर्क करत असतं आणि युजरला त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना देत असतं.

नक्की वाचा – चीनवर पुन्हा डिजिटल स्ट्राईक; १३८ बेटिंग आणि ९४ कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी, डाऊनलोड करण्यापासून सावध व्हा

लूम (Loom)

सिंगल क्लिकप्रमाणेच स्क्रीन आणि कॅमेरा रेकॉर्डिंग या सुविधेच्या माध्यमातून करु शकता. स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी जगभरातील युजर्स आणि संस्था या सुविधेचा वापर करतात. डेव्हलोपर्सच्या माहितीनुसार, लूम प्रोडक्ट डेमोजची रेकॉर्डिंग करतं. त्यामुळे फीडबॅक आणि विचारांची देवाणघेवाण करणं सोपं होतं. युजर्स 720p,1080p,1440p किंवा 4K HD फॉर्मेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करु शकतात. क्लाऊडमध्ये व्हिडीओ आपोआप सेव्ह होण्यासाठी या सुविधेचा वापर होतो.

ग्रामरली (Grammarly)

एखादा इमेल किंवा रिसर्च पेपर लिहियचा असेल, तर भाषेच्या या टूलचा वापर अनेक पद्धतीने केला जाऊ शकतो. तुमची लेखन शैली सुधारण्यासाठी तसेच भाषेचे कौशल्य वाढण्यासाठीही याचा उपयोग होतो. व्याकरणातील चुका, शब्दांचे उच्चार, स्पेलिंग बरोबर करण्यासाठी या सुविधेचा वापर केला जातो.

टोगल ट्रॅक (Toggl Track)

एकापाठोपाठ एक डेडलाईन असल्यावर टायमरवर फोकस करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. एका टास्कवर खूप जास्त वेळ खर्च होऊ नये, यासाठी टोगल ट्रॅकचा वापर होतो. या सुविधेमुळं रियल टाईम प्रॉडक्टिव्हिटी ट्रॅक करता येते. तसंच युजर कोणत्याही वेब टूलमध्ये टायमर अॅड करु शकतात. टाईम ट्रॅक करण्यासाठी आणि प्रॉडक्टिव्हिटी अनॅलिसीस करण्यासाठी हे ऑनलाईन टूल सर्वात चांगलं आहे.

हायपर राईट (HyperWrite)

खूप वेगात लिहिण्यासाठी या हायपर राईट सुविधेचा वापर केला जातो. ज्यामुळे ब्लॉग पोस्ट, इमेल आणि इतर लिखाण करणं सोपं होतं. वाक्य पूर्ण करण्यासाठी शब्द आणि वाक्यप्रचारांची उपलब्धता याद्वारे केली जाते. एखाद्या विषयाला अनुसरून हे शब्द हायपर राईटद्वारे पुरवले जातात. ग्रामरली सिंटॅक्सची काळजी घेतं. तर हायपर राईट हे एक जबरदस्त रायटिंग पार्टनर आहे.

otter.ai

अनेक प्रकारच्या टूल्सच्या माध्यमातून व्हिडीओ रेकॉर्ड आणि लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जातं. क्रोम एक्सटेन्शन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युजर ट्रान्सस्क्रीप्ट Otter.ai अकाउंटमध्ये सेव्ह करु शकतात. हे इंग्रजीमध्ये झूम, अॅंड्रॉईड, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स, सिसको वेबेक्स आणि आओएस वर उपलब्ध आहे.

प्रिंट फ्रेंडली अॅंड पीडीएफ (Print Friendly & PDF)

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युजर पेपर आणि इंकची बचत करु शकतात. हे टूल प्रिटिंग करण्याआधी अॅड्स, नेव्हिगेशन्स पेन्स आणि एक्स्ट्रा स्पेस काढून टाकतं. युजर प्रिटिंगच्या आधी पेज एडिट करु शकतात. इमेज तसंच टेक्स साईजही आवश्यकेप्रमाणे बदलू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 18:14 IST
Next Story
लैंगिक छळाचे प्रमाण वाढले! Metaverse मधील गुन्हेगारांच्या विरुद्ध शेवटी पोलिसांनी उचलले मोठे पाऊल, आतापासून..