Indian Railway Facts : प्रत्येक विमानाच्या आत एक ब्लॅक बॉक्स असतो, ज्यामध्ये त्या विमानाच्या ऑपरेशनशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती रेकॉर्ड केली जाते. अपघाताच्या वेळी विमानाचे काय झाले याची अंतिम आणि विश्वासार्ह माहिती ब्लॅक बॉक्समधूनच मिळते. पण विमानाप्रमाणे भारतीय रेल्वेतही अशाच तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रेल्वेच्या इंजिनमध्ये क्रू व्हॉईस व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टम (CVVRS) म्हणजेच एक ब्लॅक बॉक्स बसवला जाणार आहेत. ज्यावर सध्या ट्रायल सुरु आहे.

अपघात होण्यापूर्वीच देतो अलर्ट

ट्रेनच्या इंजिनमध्ये बसवलेले हे उपकरण अपघातानंतर नव्हे तर अपघात होण्यापूर्वी लोको पायलटच्या चुका आणि मार्गातील अडथळे सांगेल. यासाठी सीव्हीव्हीआरएस अपडेट करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याची तयारीही जोरात सुरू आहे. ट्रेनमधील हे ब्लॅक बॉक्स अपग्रेड केल्याने अपघाताची शक्यता तर कमी होईलच पण प्रवाशांची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO
a woman stole from a another woman purse now the video is going viral on social media
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
Ramanathapuram Independent candidate becomes a barber for a day during the election campaign
“तुमची दाढी करून देतो पण मत द्या”, प्रचारासाठी उमेदवारानं हाती घेतला वस्तरा, पुढे काय घडलं पाहा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

ब्लॅक बॉक्स काम कसे करतो?

अपग्रेड केल्यानंतर ब्लॅक बॉक्स लोको पायलट आणि इतर गोष्टींचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करणे सुरू ठेवेल आणि एक्सेप्शन अहवाल देखील तयार करेल. सिग्नल आल्यावर दोन्ही लोको पायलट बोलत आहेत की नाही? ट्रेन निर्धारित वेगापेक्षा जास्त की कमी वेगात धावत आहे? लोको पायलट नियमानुसार हॉर्न किंवा ब्रेक लावत आहे की नाही, रेल्वे रूळ, पॉइंट किंवा जॉइंट सुस्थितीत आहे की नाही, इंजिनला पुरेशी वीज मिळत आहे की नाही, अशी सर्व माहिती ब्लॅक बॉक्स रेकॉर्ड करत राहील आणि अहवाल तयार करेल.

विविध मार्गांवर धावणाऱ्या ट्रेनच्या इंजिनमध्ये बसवण्यात आलेल्या ब्लॅक बॉक्समध्ये तयार करण्यात आलेल्या एक्सेप्शन रिपोर्टच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांच्या त्रुटी दूर करून संभाव्य अपघात टाळता येणार आहेत. सामान्यतः ब्लॅक बॉक्समुळे अपघाताची कारणे शोधण्यात मदत होईल. अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचा संपूर्ण ऑडिओ आणि व्हिडिओ पाहावा लागेल. एक्सेप्शन रिपोर्टच्या तयार झाल्यानंतर अपघाताचे कारण लवकर कळेल.

प्रत्येक इंजिनमध्ये बसवण्यात येणार ४ सीसी कॅमेरे

ब्लॅक बॉक्स अंतर्गत देखरेखीसाठी, प्रत्येक इंजिनमध्ये ६ ते ८ आयपी आधारित चार डिजिटल कॅमेरे बसवले जातील. दोन कॅमेरे रेल्वे इंजिनच्या आत लोको पायलट आणि असिस्टंट पायलटवर फोकस केले जातील. तिसरा कॅमेरा इंजिनच्या बाहेर ट्रॅकच्या दिशेने असेल. म्हणजेच रेल्वे ट्रॅकही कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये असतील. चौथा कॅमेरा इंजिनच्या वरच्या भागावर बसवला जाईल, जो ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) मध्ये कोणतीही दुरुस्ती शोधेल.

ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, रेल्वे इंजिनमध्ये क्रू व्हॉईस व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टम बसवण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आठ इंजिन बसवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत सर्व इंजिनमध्ये त्याची व्यवस्था सुनिश्चित केली जाईल.

आठ इंजिनांमध्ये बसवले ब्लॅक बॉक्स

पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ईशान्य रेल्वेच्या इंजिनमध्ये ब्लॅक बॉक्स बसवण्यास सुरुवात झाली आहे. ही यंत्रणा आठ इंजिनांमध्ये कार्यरत असून, त्यापैकी गोंडा येथील लोको शेडमधील पाच इंजिनांमध्ये ब्लॅक बॉक्स बसवण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येत्या काही दिवसांत सर्व इंजिनांमध्ये ब्लॅक बॉक्सची तरतूद सुनिश्चित केली जाईल. ईशान्य रेल्वेमध्ये २२७ इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहेत.