इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. जगभरात इन्स्टाग्रामचे ५०० दशलक्ष युजर्स आहेत. इतके युजर्स असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर सतत नवनवे अपडेट येत असतात. तसेच हॅकर्सपासून सर्व अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण तरीही काही अकाउंट हॅक झालेले पाहायला मिळतात. जर कधी तुमचे अकाउंट हॅक झाले किंवा तुम्हाला तशी शंका असेल तर एक ट्रिक वापरून तुम्ही लगेच अकाउंट सुरक्षित करू शकता. कोणती आहे ही ट्रिक जाणून घ्या.

रिपोर्ट करा

13th April Panchang & Rashi Bhavishya
१३ एप्रिल पंचांग: कामात प्रगती ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल शनिवार?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
Giraffe has to face many problems while drinking water shocking video
“आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा…” जिराफाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल यामागचं कारण
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?
  • तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची शंका असेल तर लगेच त्या अकाउंटचा पासवर्ड बदला.
  • जेव्हा इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होते तेव्हा आपण कोणत्याही प्रकारे ते वापरू शकत नाही, कारण हॅकर्स खाते हॅक केल्यानंतर त्याचा पासवर्ड बदलतात.असे झाल्यास तुम्ही तक्रार नोंदवु शकता.
  • यासाठी तुम्हाला ओळखीतील एखाद्या व्यक्तीला तुमच्या इन्स्टाग्राम प्रोफाइवर जाण्यास सांगावे.
  • त्यानंतर उजव्या बाजूला येणाऱ्या हॅम्बर्ग आयकॉनवर क्लिक करा. यानंतर रिपोर्टचा पर्याय निवडुन तक्रार नोंदवा.
  • रिपोर्टमध्ये अनेक पर्याय दिसतील त्यामध्ये तुम्ही ही तक्रार का करत आहात याची नोंद करावी लागेल.
  • ‘प्रीटेंडिंग टू बी समवन एल्स’ म्हणजे अकाउंट हॅक झाल्याचा पर्याय निवडा.
  • हा पर्याय निवडल्यानंतर इन्स्टाग्राम तुमच्या अकाउंटची तपासणी करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करेल.

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

ॲक्सेस मिळवण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • तुमचे खाते हॅक केल्यानंतर हॅकर्स तुमच्या सर्व डिवाइसमधून लॉग आउट करू शकतात, यासह ते पासवर्डही बदलू शकतात.
  • अशा परिस्थितीत तुम्ही ईमेलद्वारे इन्स्टाग्राम लॉगिन लिंकची विनंती करू शकता.
  • या लिंकद्वारे इंस्टाग्राम उघडताच तुम्हाला लॉगिन स्क्रीन दिसेल.
  • पासवर्ड बदलल्यानंतर गेट हेल्प लॉगिंग इन हा पर्याय निवडा. यानंतर इन्स्टाग्राम आपल्या इनबॉक्समध्ये एक विशेष लिंक पाठवते.
  • त्यानंतर तुम्हाला मेल ओपन करून दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.
  • अशाप्रकारे तुम्ही अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकता.