आपला भारत देश आज नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. कारण भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यात आहे. आपलं विक्रम लँडर हे काही वेळातच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. याबाबत इस्रोने थेट प्रक्षेपणास सुरुवात केली आहे. हे थेट प्रेक्षपण तुम्ही पाहू शकणार आहात या व्हिडीओच्या माध्यमातून.