अॅपल ब्रँडचा आयफोन घ्यायची आकांक्षा प्रत्येकाला असते, पण भारतातील आयफोन मॉडेल्सच्या किंमती पाहून सगळ्यांनाच घाम फुटतो, पण अमेरिकेत आयफोन मॉडेल्सची किंमत भारताच्या तुलनेत कमी आहे. जास्त टॅक्समुळे आयफोन मॉडेल्सची किंमत अमेरिकेच्या तुलनेत भारतात जास्त आहे. त्यामुळे लोक त्यांच्या अमेरिकन नातेवाईकांकडून स्वतःसाठी फोन घेतात. आयफोन १४ सीरीज लाँच झाली आहे आणि आता जर तुम्ही देखील कमी किंमत लक्षात घेऊन अमेरिकेतील नातेवाईकाच्या मदतीने फोन घेण्याचा विचार करत असाल तर आता तसे करणे सोपे नाही, याने तुमचेच नुकसान होऊ शकते. तुम्ही नक्कीच विचार करत असाल की असे का? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमकं कारण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे कारण आहे

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, यूएसमध्ये आयफोन १४ सीरीज सिम-कार्ड ट्रेशिवाय लाँच करण्यात आलं आहे, तिथे राहणाऱ्या लोकांना डिव्हाइस वापरण्यासाठी ई-सिमवर अवलंबून राहावे लागेल कारण ई- सिम फोनशी कनेक्ट केलेले नाही. ते मदरबोर्डवरच निश्चित केले आहे आणि ते भौतिकरित्या काढले जाऊ शकत नाही.

( हे ही वाचा: e-SIM म्हणजे काय? जाणून घ्या ते कसे आणि कुठे खरेदी करायचे)

भारतात eSIM नाही का?

यूएस मध्ये लाँच केलेल्या आयफोन १४ प्रकारांमध्ये सिम कार्ड ट्रे उपलब्ध होणार नाही, परंतु सिम-कार्ड ट्रे भारतीय आयफोन १४ प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. पण जर तुम्ही यूएस मधून फोन मागवला तर त्यासाठी तुम्हाला प्रथम ई-सिमसाठी अर्ज करावा लागेल आणि तुमचे फिजिकल सिम काढून टाकावे लागेल. ई-सिमवर स्विच करण्याचा अर्थ असा आहे की आपण यापुढे भौतिक सिमसह Android किंवा इतर iOS डिव्हाइसेसवर स्विच करू शकणार नाही. eSIM भारतात सहज उपलब्ध आहे, दूरसंचार कंपनी Vodafone Idea म्हणजेच ​​Vi, Airtel आणि Reliance Jio कडे e-SIM ची सुविधा आहे. तुम्हाला फक्त यापैकी कोणत्याही कंपनीच्या स्टोअरला भेट देऊन eSIM सक्रिय करावे लागेल.

आयफोन १४ किंमत US विरुद्ध India

आयफोन १४ ची US मध्ये किंमत $799 (अंदाजे रु. ६३,७००) पासून सुरू होते. तर तिथेच, आयफोन १४ च्या भारतातील किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय मॉडेलची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते. फरकाबद्दल बोलायचे तर, दोन्ही ठिकाणच्या बेस व्हेरिएंटच्या किमतीत १६२०० रुपयांचा फरक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 14 to buy new apple from us dont buy here is the reason gps
First published on: 09-09-2022 at 13:55 IST